काहुर लघुपट आंतरराष्ट्रीय महोत्सवांसाठी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 15:27 IST2016-10-14T10:08:28+5:302016-10-17T15:27:49+5:30

       सध्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य पदार्थांमुळे मृत्युमुखी पडणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याच विषयाची नस पकडत ...

Kahoor Short Film Ready for International Festivals | काहुर लघुपट आंतरराष्ट्रीय महोत्सवांसाठी सज्ज

काहुर लघुपट आंतरराष्ट्रीय महोत्सवांसाठी सज्ज

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;"> 
     सध्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य पदार्थांमुळे मृत्युमुखी पडणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याच विषयाची नस पकडत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तरुणांनी एकत्र येऊन सामाजिकतेचे भान जपत काहुर या लघुचित्रपटाची निर्मिती केली. हा चित्रपट सध्या अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये दाखविण्यात येणार आहे.  नितिन बनसोडे लिखित काहुर या लघुचित्रपटाच्या निर्मितीमध्ये  तुषार रणवरे, नागेश नितृडकर व निलेश बुधावले या तिहेरी जोडीचे योगदान आहे. लघुचित्रपटाची कथा सर्वसामान्य कुटुंबात घडणारी आहे. चौथीत शिकणारी मुलगी वडिलांच्या सतत तंबाखु खाताना पहात होती. इतरांप्रमाणे तिला देखील हे नित्याचे झाले असताना अचानक शाळेतील बाई विद्यार्थ्यांना तबांखू मुळे होणाºया दुष्परिणामांची माहिती देतात. आणि तिथुन पुढे शालुची होणारी मानसिक कोलहल व वडिलांची तंबाखू सोडवण्यासाठीचा प्रवास दाखवण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. चित्रपटाच्या प्रवासाबाबत बोलताना तुषारने सांगितले, अतिशय कडाक्याच्या थंडित मावळ परिसरात पहाटेच्या वेळी हव्या असणाºया दृश्यासाठी चित्रपटाची अठरा जणांची टिम कशाचीही तमा न बाळगता काम करत होती. लघुचित्रपटाची कथा अतिशय साधी सरळ आपल्या आजू-बाजूला घडणारी असली तरी कलाकारांनी केलेल्या मेहनतीमुळे ती हृद्ययाला चटकन स्पर्श करुन जाते.लघुपटात वडिलांच्या भुमिकेत नितीन बनसोडे, मुलीच्या भुमिकेत गौतमी काची, आईच्या भुमिकेत सारिका काची आहे. 

 

Web Title: Kahoor Short Film Ready for International Festivals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.