'वेड' फेम अभिनेत्री जिया शंकरच्या 'मिस्ट्री मॅन'चं नाव आलं समोर, 'या' बिझनेसमॅनला डेट करतेय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 16:05 IST2026-01-04T15:57:21+5:302026-01-04T16:05:15+5:30
सोशल मीडियावर जियाच्या जोडीदाराची चर्चा; चाहत्यांनी अखेर शोधूनच काढलं त्याचं नाव

'वेड' फेम अभिनेत्री जिया शंकरच्या 'मिस्ट्री मॅन'चं नाव आलं समोर, 'या' बिझनेसमॅनला डेट करतेय!
Jiya Shankar : 'बिग बॉस ओटीटी २' मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री जिया शंकर सध्या तिच्या प्रोफेशनल कामापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपासून जिया आणि प्रसिद्ध युट्यूबर अभिषेक मल्हान यांच्या साखरपुड्याच्या बातम्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. मात्र, जियाने या सर्व अफवांना पूर्णविराम देत एका 'मिस्ट्री मॅन'सोबतचा रोमँटिक फोटो शेअर केला. पण, जियानं तिच्या बॉयफ्रेंडचं नाव उघड केलं नाही. आता हा 'मिस्ट्री मॅन' नेमका कोण? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.
सोशल मीडियावरील युजर्स आणि काही रिपोर्ट्सनुसार, जियाच्या आयुष्यातला तो 'मिस्ट्री मॅन' हा करण धनक असल्याचं म्हटलं जात आहे. करण हा अमेरिकेत हुक्का पार्लर चालवतो आणि काही कायदेशीर बाबींमुळेही तो चर्चेत राहिला आहे. मात्र, जियाने अद्याप करणसोबतच्या नात्यावर अधिकृत शिक्कामोर्तब केलेले नाही.
अभिषेक मल्हान आणि जियाच्या साखरपुड्याच्या बातम्यांवर दोघांनीही स्पष्टीकरण दिले आहे. जियाने सोशल मीडियावर स्पष्ट केले की, ती सध्या कोणाशीही साखरपुडा करत नाहीये. दुसरीकडे, अभिषेकनेही या अफवा फेटाळून लावल्या. दरम्यान, आता जिया तिच्या या 'मिस्ट्री मॅन'चा चेहरा चाहत्यांना कधी दाखवते, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.