जिनिलिया डिसोजा देशमुख आणि रितेश देशमुख दिवाळीला घेऊन येत आहेत फास्टर फेणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 10:35 IST2017-10-03T05:05:34+5:302017-10-03T10:35:34+5:30
जिनिलिया डिसोजा देशमुख, रितेश देशमुख आणि झी स्टुडिओज यांची निर्मिती असलेला फास्टर फेणे २७ ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे.
जिनिलिया डिसोजा देशमुख आणि रितेश देशमुख दिवाळीला घेऊन येत आहेत फास्टर फेणे
भ . रा. भागवत यांच्या लेखणीतून साकारलेला आपल्याच मातीतला, आपल्यातलाच एक सामान्य पण असामान्य व्यक्तिमत्त्वाचा, हुशार आणि चौकस मुलगा अवघ्या महाराष्ट्राचा लाडका 'फास्टर फेणे' येत्या २७ ऑक्टोबरला रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. लई भारीसारख्या यशस्वी चित्रपटानंतर झी स्टुडिओज आणि जिनिलिया डिसोजा देशमुख आणि रितेश देशमुख यांची मुंबई फिल्म कंपनी पुन्हा एकदा या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आली आहे. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित आणि क्षितिज पटवर्धन यांच्या लेखणीतून साकारलेला फास्टर फेणे हा चित्रपट प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरणार आहे. झी मराठीवरील दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून घराघरांत पोहोचलेला अमेय वाघ या चित्रपटात बनेश उर्फ फास्टर फेणेच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच चित्रपटात गिरीश कुलकर्णी आणि दिलीप प्रभावळकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
बनेश्वरवरून पुण्यात मेडिकलची परीक्षा देण्यासाठी आलेल्या एका जिज्ञासू आणि उत्साही मुलाची म्हणजेच बनेश फेणेची कथा प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. पक्षीमित्र, निसर्गप्रेमी, टेक्नॉलॉजिचा चाहता आणि सायकलपटू असलेला बनेश पुण्यात येतो तेव्हा तो, त्याची बालमैत्रीण आणि आता पत्रकार असलेल्या अबोलीला तसेच गुन्हेगारी सोडून सरळमार्गी जगायला लागलेल्या लहान मुलाला- भूभूला भेटतो. बनेश परीक्षेच्या तयारीला लागतो. परीक्षा केंद्रावर त्याची धनेश नावाच्या एका चुणचुणीत आणि हुशार मुलाशी ओळख होते आणि दुसऱ्याच दिवशी एक अनपेक्षित घटना घडते. ही घटना बनेशला मुळापासून हादरवून टाकते आणि सगळ्यांच्याच आयुष्यात एक विलक्षण गुंतागुंत निर्माण होते. शिक्षण व्यवस्थेच्या विरोधात आणि सर्वसामान्य माणसाच्या आकलनापलीकडे असणारा निगरगट्ट वृत्तीचा अप्पा; सत्य शोधून काढल्याशिवाय चैन न पडणाऱ्या आणि संकटांना बेधडकपणे सामोरे जाणाऱ्या फेणेसमोर आव्हान म्हणून उभा ठाकतो. या जीवघेण्या शोधात फेणे यशस्वी होतो का याबद्दलचा उत्कंठावर्धक प्रवास या चित्रपटामधून पाहायला मिळेल. अप्पांच्या भूमिकेत दिसणार आहेत राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि अष्टपैलू अभिनेते गिरीश कुलकर्णी. या चित्रपटाचे प्रेरणास्थान असणारे भा. रा.भागवत हे सुद्धा या चित्रपटात आहेत हे विशेष आणि ही भूमिका साकारली आहे ज्येष्ठ आणि महाराष्ट्राचे लाडके अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी.
कथा, पटकथा आणि संवाद या माध्यमातून भा. रा. भागवतांचा सत्तर-ऐंशीच्या दशकातला फास्टर फेणे क्षितिज पटवर्धन यांनी आजच्या काळात आणला आहे. चित्रपटात अमेय वाघ, गिरीश कुलकर्णी, दिलीप प्रभावळकर, पर्ण पेठे, शुभम मोरे, ओम भुतकर, अंशुमन जोशी, श्रीकांत यादव आणि चिन्मयी सुमीत अशी कलाकारांची मांदियाळी आहे. नारबाची वाडी, क्लासमेट्ससारख्या यशस्वी चित्रपटांचे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी या नव्या काळाच्या नव्या फास्टर फेणेला पडद्यावर साकारले आहे.
वेग आणि थरार असलेल्या या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटाचे शुटिंग तब्बल साठ वेगवेगळ्या लोकेशन्सवर पार पडले असून चित्रीकरणाची जबाबदारी पेलली आहे मिलिंद जोग यांनी आणि ध्वनीआरेखन केलेलं आहे प्रमोद चांदवरकर आणि प्रणाम पानसरे यांनी वेशभूषाकार कल्याणी कुलकर्णी-गुगळे यांनी फास्टर फेणेला त्याच्या पेहरावातून वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. चित्रपटाचे बहुचर्चित पार्श्वसंगीत केले आहे ट्रॉय आणि अरिफ या संगीतकार जोडीने तर संकलन केले आहे फैजल महाडिक आणि इम्रान महाडिक यांनी.
सोशल मीडियावर या चित्रपटाच्या दोन्ही टिझरला जोरदार प्रतिसाद मिळाला असून या चित्रपटाविषयी प्रेक्षकांची उत्सुकता वाढणार यात शंका नाही. हा सिनेमा भा. रा भागवत यांना आदरांजली म्हणून त्यांच्या स्मृतीदिनी २७ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे. झी स्टुडिओजचे मंगेश कुलकर्णी आणि मुंबई फिल्म कंपनीचे जिनिलिया आणि रितेश देशमुख यांची निर्मिती असलेला फास्टर फेणे हा चित्रपट प्रत्येक पिढीतील प्रेक्षकांचे मन जिंकून घेण्यास सज्ज झालाय.
Also Read : कोणत्या चित्रपटाच्या माध्यमातून विवेक करतोय मराठीत पदार्पण ?