'झिम्मा2' मध्ये काय असेल याची उत्सुकता होती आणि..'; अभिजीत खांडकेकरची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 03:22 PM2023-11-24T15:22:01+5:302023-11-24T15:22:59+5:30

Abhijieet khandkekar: अभिजीत खांडकेकर याने झिम्मा २ हा सिनेमा पाहिला असून त्याची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

jhimma-2-movie-watch-after-abhijieet-khandkekar-give-his-reaction | 'झिम्मा2' मध्ये काय असेल याची उत्सुकता होती आणि..'; अभिजीत खांडकेकरची पोस्ट चर्चेत

'झिम्मा2' मध्ये काय असेल याची उत्सुकता होती आणि..'; अभिजीत खांडकेकरची पोस्ट चर्चेत

सध्या मराठी कलाविश्वासह प्रेक्षकांमध्ये हेमंत ढोमे (hemant dhome) याच्या 'झिम्मा 2'   (jhimma 2) या सिनेमाची जोरदार चर्चा रंगली आहे. नुकताच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.  त्यामुळे सध्या हा सिनेमा चर्चिला जात आहे. झिम्माप्रमाणेच झिम्मा २ देखील बॉक्स ऑफिसवर गाजताना दिसत आहे. केवळ प्रेक्षकच नाही तर अनेक कलाकारांनीही हा सिनेमा पाहिला असून त्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. यामध्ये अभिनेता अभिजीत खांडकेकर याने झिम्मा २ हा सिनेमा पाहिला असून त्याची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.


काय आहे अभिजीतची पोस्ट?

झिम्माच्या पहिल्या भागाने अख्खा महाराष्ट्र दणाणून सोडल्यानंतर दुसऱ्या भागात काय असेल ह्याची खूप उत्सुकता होती …. आणि हेमंत did not disappoint me at all . चार पाच वेगवेगळ्या बायका, त्यांना ट्रीपवर घेऊन जाणारा एक तरूण , प्रत्येकाची आपापली बॅगेजेस आणि ह्या संपूर्ण प्रवासात त्यांनाच नाही तर आपल्यालाही पुन्हा नव्याने कळणार्या कितीतरी गोष्टी…
साधी सोपी अजिबात फॅन्सी नसलेली कन्सेप्ट पण त्यात जे काही रंग भरले आहेत…. त्याला तोड नाही. मनोरंजन व्हावं म्हणून काहीतरी विनोदी करावं की एखाद्या न बोलल्या जाणाऱ्या विषयावर प्रबोधन करावं ह्या सगळ्याच्या सीमा तोडत कथा कशी मांडावी तर अशी. इरावतीचं लिखाण कधी स्क्रिप्ट वाटतच नाही. प्रत्येक बाई वेगळी, तीचा स्वभाव, पार्श्वभूमी,  इश्यू वेगळे पण त्यांचं एकत्र येणं तुम्हाला हसवतं , रडवतं , अंतर्मुख व्हायला भाग पाडतं..झिम्मा २ मध्ये तर कितीतरी विषयांना हाताळून, अल्लाद कथेत गुंफवत, निर्मिती ताई, सुहास ताई, क्षिती, सुचित्रा ताई अश्या बाप अभिनेत्रींना मुक्त सोडत, सिद्धार्थ, सायली, शिवानी, रिंकू अश्या मल्टी टॅलेंटेड कलाकारांकडून खुबीने त्यांची पात्र साकारून घेत आणि मुख्य म्हणजे कुठल्याही बडेजावा शिवाय हेमंतने कमालीनं हा ‘महा झिम्मा’ सहजतेनं घातलाय. वेगवेगळे पदर गुंता होऊ न देता अलगद उलगडून दाखवावेत तर असे.

सुहासताईच्या सहजतेचं काय करावं, सुचित्राताई सारखी आत्या तर प्रत्येक कुटुंबात असतेच. निर्मितीताई नुसती पडद्यावर दिसली तरी हास्याचे स्फोट होतात ही तीची ताकद. क्षितीच्या सीनची तर वाट बघावी आणि तीने सिक्सरच मारावा, सायली जशी दिसते, आहे त्या उलट कॅरेक्टर सुरेख साकारलय. एवढ्या सगळ्या बायकांना सांभाळणारा कबीर सिद्धूने तोडलाय. विशेष कौतुक शिवानी आणि रिंकूचं - गॅंगमध्ये नविन असुनही inseparable. सुंदर कामं केलीयेत. क्षितिजच्या गाण्यांमधून अख्खा सिनेमा कळावा इतकी अर्थपूर्ण .अमितराजचं संगीत हे एक ह्या सगळ्यांबरोबर असणारं कॅरेक्टरच. सचिन गुरवचं पोस्टर तितकंच बोलकं, इरावती, हेमंत थॅंक यू ह्या कमाल अनुभवासाठी. आनंद एल राय आणि जिओ मुळे यंदा टीम अजुनच भक्कम झालीये त्यामुळे यंदा झिम्मा २ अजुनच गाजवणार यात शंका नाही. हा रिव्ह्यू किंवा परिक्षण नाही. मी लेखक नसल्याने हे लिहिलेलं माझ्या विचारांइतकच विस्कळीत आहे पण मुद्दा हाच की चित्रपट आजपासून प्रदर्शित होतोय, तो नवनवीन विक्रम करेलच, तुम्ही लवकरात लवकर पहा.

Web Title: jhimma-2-movie-watch-after-abhijieet-khandkekar-give-his-reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.