जावेद अलीचा मराठी सूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2016 14:34 IST2016-08-09T09:03:58+5:302016-08-09T14:34:34+5:30

आय अम नॉट स्लमडॉग आय अम इंडियन  हा आगामी मराठी चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटासाठी बॉलिवूडमधील तगडा ...

Javed Ali's Marathi Sur | जावेद अलीचा मराठी सूर

जावेद अलीचा मराठी सूर

अम नॉट स्लमडॉग आय अम इंडियन  हा आगामी मराठी चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटासाठी बॉलिवूडमधील तगडा  गायक जावेद अलीने याने गाण गायलं आहे. या चित्रपटात त्याने मुंबई साठी... मुंबईसाठी...हे गाणं गायलं आहे. हे गाणे यशराज स्टुडिओमध्ये रेकॉर्ड करण्यात आले आहे. गीतकार युग यांने हे गाणे लिहीले असून फेथ फाईव्ह या टीमने या गीताला संगीत दिले आहे. आय अम नॉट स्लमडॉग आय अम इंडियन या चित्रपटाची निर्मिती राजन डोगरा यांनी केली आहे. तर अभिनेता युग याने या चित्रपटाची कथा लिहिली असून दिग्दर्शनही देखील केले आहे. या चित्रपटात युगने मुख्य भूमिकाही साकारली आहे. उषा नाडकर्णा, उदय सबनीस, राजन राणे, शामलाल नावत, उमेश बोळके, अजहर भट, नीलांबरी, दुर्गेश नाबर, तेजस मानकर, स्वकीत, स्वप्निल मोरे, अतुल, वामन परब, अनिल, कुणाल नाईक, शीतल कुलकर्णी, अमर गिरी, राजन, वेन्डोला, जॉय या कलाकारांचा या चित्रपटात समावेश आहे. 

Web Title: Javed Ali's Marathi Sur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.