वयाची चाळीशी ओलांडूनही इतकी दिसते सुंदर, हे आहे रेशम टिपणीसच्या फिटनेसचे रहस्य?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2018 15:16 IST2018-04-05T09:46:28+5:302018-04-05T15:16:28+5:30

रेशम टिपणीस पुन्हा एकदा चर्चेत येण्याचं कारण म्हणजे ती धकधक गर्ल माधुरी दीक्षित हिच्या बकेटलिस्ट या पहिल्यावहिल्या मराठी सिनेमात ...

It seems so beautiful across the age of 40, is this the secret of the silk tiptoe fitness? | वयाची चाळीशी ओलांडूनही इतकी दिसते सुंदर, हे आहे रेशम टिपणीसच्या फिटनेसचे रहस्य?

वयाची चाळीशी ओलांडूनही इतकी दिसते सुंदर, हे आहे रेशम टिपणीसच्या फिटनेसचे रहस्य?

शम टिपणीस पुन्हा एकदा चर्चेत येण्याचं कारण म्हणजे ती धकधक गर्ल माधुरी दीक्षित हिच्या बकेटलिस्ट या पहिल्यावहिल्या मराठी सिनेमात ती झळकणार आहे. रेशमला माधुरीसह स्क्रीन शेअर करण्याची संधी यानिमित्ताने मिळणार आहे.या सिनेमात रेशमची भूमिका कशी असेल हे मात्र अद्याप समोर आलेले नाही.या सिनेमाच्या निमित्ताने रेशमचीे माधुरीसह काम करण्याची इच्छा पूर्ण होत आहे.त्यामुळेच याचा आनंद तिच्या सोशल मीडियावरील फोटोतून पाहायला मिळत आहे.सिनेमाच्या सेटवर माधुरीसह फोटो काढण्याची संधी रेशमला मिळाली आहे. हेच फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. माधुरीच्या रुपाने एक चांगली मैत्रीण गवसली असंही तिने या फोटोसह पोस्ट केले आहे. गेल्या काही वर्षापासून रेशम अभिनयाच्या क्षेत्रात कार्यरत आहे.'बाजीगर' या हिंदी सिनेमातील अंजली सिन्हा ही भूमिका तिने साकारली होती.याशिवाय 'भीष्मप्रतिज्ञा','जय हो','मेरे यार की शादी हैं' या हिंदी सिनेमात रेशमने भूमिका साकारल्यात.याशिवाय छोट्या पडद्यावरील हिंदी आणि मराठी मालिकांमध्येही रेशम झळकली आहे. वयाच्या ४५व्या वर्षीही रेशम फिट आहे. तिच्याकडे पाहिलं असता कुणालाही तिच्या वयाचा अंदाज लावणं कठीण आहे. रेशम टिपणीस सध्या घटस्फोटित आहे. १९९३ साली तिचं अभिनेता संजीव सेठसह लग्न झालं होतं. तब्बल ११ वर्षे एकत्र संसार केल्यानंतर २००४ रेशम आणि संजीव यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.या दोघांना रिषिका आणि मानव ही दोन मुलं आहेत. 

'बकेट लिस्ट' या चित्रपटात ती पुण्यात राहाणाऱ्या एका स्त्रीची भूमिका साकारत आहे.पुण्यात राहाणाऱ्या लोकांची बोलण्याची ढब ही मुंबईतील लोकांपेक्षा वेगळी असते. त्यामुळे माधुरीने ही ढब शिकली आहे.एवढेच नव्हे तर या चित्रपटातील काही दृश्यांमध्ये माधुरी आपल्याला बाईक चालवताना दिसणार आहे. त्यामुळे या चित्रपटासाठी ती बाईक चालवायला सुद्धा शिकली आहे.हा चित्रपट २५ मे ला प्रदर्शित होणार आहे.माधुरी दीक्षितने ट्वीट करत याविषयी तिच्या चाहत्यांना सांगितले आहे.तिने या चित्रपटाचे एक नवे पोस्टर पोस्ट केले असून यामध्ये माधुरी आपल्याला बाईक चालवताना दिसत आहे. करण जोहरने देखील मराठीत ट्वीट करत बकेट लिस्ट या चित्रपटाबाबत सांगितले आहे. त्याने ट्वीटमध्ये माधुरीला टॅग करत आपण दोघही पूर्ण करुया आपली BucketList असे लिहिले आहे. 

Web Title: It seems so beautiful across the age of 40, is this the secret of the silk tiptoe fitness?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.