​INTERVIEW : केतकी माटेगावकर म्हणते, कतृत्वावर विश्वास ठेवा, यश हमखास मिळेल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2017 17:47 IST2017-02-12T12:17:40+5:302017-02-12T17:47:40+5:30

-Ravindra More जळगावात आयोजित बहिणाबाई महोत्सवाच्या उद्घाटनापूर्वी पत्रपरिषेदत बोलताना केतकी माटेगावकर हिने तरुण-तरुणींना संदेश देताना म्हणाली की, आम्ही चित्रपटात ...

INTERVIEW: Ketaki Mategaonkar says, believe in the legend, success will be guaranteed! | ​INTERVIEW : केतकी माटेगावकर म्हणते, कतृत्वावर विश्वास ठेवा, यश हमखास मिळेल !

​INTERVIEW : केतकी माटेगावकर म्हणते, कतृत्वावर विश्वास ठेवा, यश हमखास मिळेल !

ong>-Ravindra More

जळगावात आयोजित बहिणाबाई महोत्सवाच्या उद्घाटनापूर्वी पत्रपरिषेदत बोलताना केतकी माटेगावकर हिने तरुण-तरुणींना संदेश देताना म्हणाली की, आम्ही चित्रपटात काम करीत असताना तो चित्रपट चालेल की नाही याची शाश्वती नसते, मात्र आम्ही आपल्या कतृत्वावर विश्वास ठेवून जीव ओतून ते काम करतो. त्यामुळे सर्वांनी आपल्या कतृत्वावर विश्वास ठेवला तर यश हमखास मिळू शकते. 

या पत्रपरिषदेवेळी समन्वयक अश्विीनी शेंडगे यांच्यासह केतकीचे वडील पराग माटेगावकर हे उपस्थित होते. 
तिच्या या क्षेत्राबाबत पत्रकारांनी विचारले असता केतकी म्हणाली की, आमच्या घरात तसा अभिनयाचा वारसा आहे,  मात्र मी या क्षेत्रात येईल याचा कधीच विचार केला नव्हता. ‘अवघा रंग एकची झाला’ या नाटकाच्या संगीतामुळे मी त्यात काम केले व त्यानंतर अभिनयाचा हा प्रवास सुरू झाल्याचे तिने सांगितले. 
‘तानी’ चित्रपटातील कथानकाबाबत बोलताना ती म्हणाली की, मुलांवर अभ्यासाचे ओझे कधीच टाकू नका. जेवढे खेळते वातावरण ठेवले तेवढा मुलांमध्ये विश्वास वाढतो. 

खूप शिकायला मिळाले
शाळा चित्रपटात आम्ही सर्व बरोबरीचे होतो, मात्र काकस्पर्शमध्ये सर्वजण माझ्यापेक्षा खूप मोठे होते, ती भूमिका करताना  मला खूप शिकायला मिळाले, असे तिने आवर्जून सांगितले. 

नवीन विषय आवडतात
चित्रपट करताना त्यात काही तरी नवीन असावे, त्याला मी जास्त पसंती देते, असे सांगून केवळ हास्य विनोद, ‘रोमॅण्टीक’ दृष्य आहे, त्याला प्राधान्य देऊन चालत नाही, असे केतकीने स्पष्ट केले. 

लवकरच ‘प्रेमळ’ कलाकृती
प्राजू-दगडू जोडीने जे ‘वेड लावले’ तशी कलाकृती आणखी आहे का, असे विचारले असता ती म्हणाली अशी कलाकृती लवकरच येणार असून त्याबाबत मात्र गुप्तता आहे, असे तिने स्पष्ट केले. 

खान्देशात ‘टॅलेण्ट’
चित्रपट सृष्टीत केवळ मुंबई-पुण्याला स्थान आहे, याचे खंडण करून ती म्हणाली की, खान्देशातील कलावंतांमध्येही मोठे ‘टॅलेण्ट’ आहे. तेही चित्रपट, नाट्यसृष्टीत येऊन चांगली कला सादर करीत असल्याचे ती म्हणाली.

Web Title: INTERVIEW: Ketaki Mategaonkar says, believe in the legend, success will be guaranteed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.