अशी सुचली 'बॉईज-२' ची गोष्ट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 03:15 PM2018-09-05T15:15:19+5:302018-09-05T15:17:53+5:30

'बॉईज 2' सिनेमाच्या पोस्टरप्रमाणे या टीझरलादेखील प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमाच्या टीझरमधून सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाड यांची लंपटगिरी आपल्याला पहावयास मिळते.शाब्दिक कोट्यांची युथफुल मस्ती दाखवणारा हा टीझर तरुणाईला नादखुळा करून सोडत आहे.

Interesting Facts About Boys 2 Marathi Movie | अशी सुचली 'बॉईज-२' ची गोष्ट !

अशी सुचली 'बॉईज-२' ची गोष्ट !

googlenewsNext

'बॉईज' सिनेमाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर, येत्या ५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणा-या या सिनेमाच्या सिक्वेलची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगत आहे. विशाल देवरुखकर दिग्दर्शित या नव्या 'बॉईज २' मध्ये देखील बॉईजची तीच धम्मालमस्ती अनुभवता येणार आहे. मात्र, या सिनेमाची गोष्ट एका घटनेने सुचली असल्याचे विशाल देवरुखकर सांगतात. 'बॉईज' च्या सिक्वलसाठी तितकाच ताकदीचा विषय निवडण देखील गरजेचं होतं, त्यासाठी तोडीस तोड अश्या विषयाच्या शोधात मी आणि ऋषिकेश कोळी होतो. परंतु, चार-पाच महिने होऊनदेखील आम्हाला काहीच सुचत नव्हत. मात्र, एकदा अचानक माझा फोन बंद झाला, आणि त्यातूनच 'बॉईज २' ची गोष्ट आम्हाला सापडली', असे विशाल देवरुखकर यांनी  सांगितले.
 
अवघ्या दोन तीन तासासाठीच बंद पडलेल्या फोनमुळे जर विशाल यांची इतकी अवस्था वाईट होऊ शकते, तर कॉलेज तरुणासाठी त्यांचा फोन किती महत्वाचा असेल? असा प्रश्न विशाल यांना पडला. त्यांनी लागलीच हा विचार ऋषीकेश कोळीला बोलून दाखवला. ऋषिकेशने देखील त्याला पसंती देत 'बॉईज २' चे लिखाण सुरु केले. अशा या अनावधाने सुचलेल्या 'बॉईज २' चित्रपटामध्ये शाळेतून कॉलेजमध्ये गेलेल्या 'बॉईज' ची धम्माल पाहायला मिळणार आहे. इरॉस इंटरनेशनल आणि एवरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत, अवधूत गुप्ते यांच्या सहयोगाने सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रोडक्शन अंतर्गत प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाचे लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि संजय छाब्रिया यांनी निर्मात्याची धुरा सांभाळली आहे. इतकेच नव्हे तर इरॉस इंटरनेशनलद्वारे 'बॉईज २' चित्रपटाचे जागतिक स्तरावर वितरण देखिल केले जाणार आहे. किशोरवयीन मुलांच्या गंमती नंतर, महाविद्यालयीन जगात रमलेले हे बॉईज आता कोणती धम्माल घेऊन येत आहेत, हे पाहणे रंजक ठरणार आहेत.

शाळेतल्या करामतीनंतर महाविद्यालयाची पायरी चढलेले धैर्या, ढुंग्या आणि कबीर आता ‘बॉईज २’ मध्ये डबल धमाका करण्यास येत आहे. 'हाईट छोटी आहे, पण फाईट मोठी आहे' अशी धम्माल टॅगलाईन असलेल्या या सिनेमाच्या पोस्टरने अल्पावधीतच तुफान प्रसिद्धी मिळवली आहे. त्यामुळे,या पोस्टरनंतर 'बॉईज २' चा धमाकेदार टीझर नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर लाँच करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, पोस्टरप्रमाणे या टीझरलादेखील प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमाच्या टीझरमधून सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाड यांची लंपटगिरी आपल्याला पहावयास मिळते. शाब्दिक कोट्यांची युथफुल मस्ती दाखवणारा हा टीझर तरुणाईला नादखुळा करून सोडत आहे. इरॉस इंटरनेशनल आणि एवरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत, अवधूत गुप्ते यांच्या सहयोगाने सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रोडक्शन अंतर्गत प्रदर्शित होत असलेला 'बॉईज २' हा सिनेमा महाविद्यालयीन तरुणांसाठी पर्वणीच ठरणार आहे. 

Web Title: Interesting Facts About Boys 2 Marathi Movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.