'बॉईज’चा डबल दंगा दाखवतोय ‘बॉईज २’चा टीझर,एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2018 01:59 PM2018-09-01T13:59:04+5:302018-09-03T06:00:00+5:30

शाब्दिक कोट्यांची युथफुल मस्ती दाखवणारा हा टीझर तरुणाईला नादखुळा करून सोडत आहे.

Boys 2 Marathi Movie Teaser Released | 'बॉईज’चा डबल दंगा दाखवतोय ‘बॉईज २’चा टीझर,एकदा पाहाच

'बॉईज’चा डबल दंगा दाखवतोय ‘बॉईज २’चा टीझर,एकदा पाहाच

googlenewsNext

शाळेतल्या करामतीनंतर महाविद्यालयाची पायरी चढलेले धैर्या, ढुंग्या आणि कबीर आता ‘बॉईज २’ मध्ये डबल धमाका करण्यास येत आहे. 'हाईट छोटी आहे, पण फाईट मोठी आहे' अशी धम्माल टॅगलाईन असलेल्या या सिनेमाच्या पोस्टरने अल्पावधीतच तुफान प्रसिद्धी मिळवली आहे. त्यामुळे,या पोस्टरनंतर 'बॉईज २' चा धमाकेदार टीझर नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर लाँच करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, पोस्टरप्रमाणे या टीझरलादेखील प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमाच्या टीझरमधून सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाड यांची लंपटगिरी आपल्याला पहावयास मिळते. शाब्दिक कोट्यांची युथफुल मस्ती दाखवणारा हा टीझर तरुणाईला नादखुळा करून सोडत आहे. इरॉस इंटरनेशनल आणि एवरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत, अवधूत गुप्ते यांच्या सहयोगाने सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रोडक्शन अंतर्गत प्रदर्शित होत असलेला 'बॉईज २' हा सिनेमा महाविद्यालयीन तरुणांसाठी पर्वणीच ठरणार आहे. 

विशाल देवरुखकर दिग्दर्शित ‘बॉईज’ चा हा धम्माकेदार सिक्वेल ५ ऑक्टोबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. शिवाय ऋषिकेश कोळीच्या संवादलेखनाची बरसात या सिनेमात पाहायला मिळणार आहे. लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि संजय छाब्रिया यांनी या सिनेमाच्या निर्मात्याची धुरा सांभाळली असून, इरॉस इंटरनेशनलद्वारे 'बॉईज २' चित्रपटाचे जागतिक स्तरावर वितरण देखील केले जाणार आहे.'आम्ही लग्नाळू' म्हणत सर्व किशोरवयीन मुलांना 'बॉईज' या चित्रपटाने चांगलीच भुरळ पाडली होती. नुकताच या सिनेमाचा सोशल नेट्वर्किंग साईटवर टीझर पोस्टर लाँच करण्यात आला. त्यामुळे या चित्रपटाबाबतची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे. 


 

Web Title: Boys 2 Marathi Movie Teaser Released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.