सैराटमधील इनामदार वाडा पाण्यात बुडाला !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2016 12:22 IST2016-08-09T06:52:01+5:302016-08-09T12:22:01+5:30
‘सैराट’चित्रपटाने सर्वांनाच सैराटमय करुन सोडले आहे. प्रत्येकाच्या तोंडावर सैराटचीच चर्चा होत आहे. चित्रपटातील लोकेशन, त्यामधील गाणे, सर्वच अविस्मरणीय. ...

सैराटमधील इनामदार वाडा पाण्यात बुडाला !
‘सैराट’चित्रपटाने सर्वांनाच सैराटमय करुन सोडले आहे. प्रत्येकाच्या तोंडावर सैराटचीच चर्चा होत आहे. चित्रपटातील लोकेशन, त्यामधील गाणे, सर्वच अविस्मरणीय. त्यातीलच आर्ची आणि परशाचे निरागस प्रेम ज्या ठिकाणी फुलले ते ठिकाण म्हणजे इनामदार वाडा. मात्र आता हा वाडा पाण्याखाली बुडाल्याचे समजते. उजनी धरणातील पाणीसाठा वाढल्याने हा वाडा पाण्याखाली आलाय.
सैराट सिनेमाने प्रेक्षकांने याड लावल्यानंतर ज्या ठिकाणी या सिनेमाचे शूटिंग झाले होते त्याठिकाणी प्रेक्षकांची मोठी गर्दी होत होती. इनामदार वाड्याचाही यात समावेश होता.
सैराट प्रदर्शित झाल्यानंतर या वाड्याला भेट देणाऱ्यांची संख्याही वाढली होती.