'…मी फिदा झाले तुझ्यावर', अमृता खानविलकरची ती पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 06:00 AM2022-04-21T06:00:00+5:302022-04-21T06:00:02+5:30

Amruta Khanvilkar: अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या आगामी चित्रपट 'चंद्रमुखी' (Chandramukhi Movie) चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. या चित्रपटात तिने चंद्राची भूमिका साकारली आहे.

'I fell in love with you', Amrita Khanvilkar's post discusses | '…मी फिदा झाले तुझ्यावर', अमृता खानविलकरची ती पोस्ट चर्चेत

'…मी फिदा झाले तुझ्यावर', अमृता खानविलकरची ती पोस्ट चर्चेत

googlenewsNext

अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) सध्या आगामी चित्रपट 'चंद्रमुखी' (Chandramukhi Movie) चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. या चित्रपटात तिने चंद्राची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील लावण्यांना प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे. या सर्व गाण्यांचे नृत्य दिग्दर्शन आशिष पाटील आणि दीपाली विचारे यांनी केले आहे. नुकतेच अमृता खानविलकर हिने इंस्टाग्रामवर नृत्यदिग्दर्शक आशिष पाटीलसाठी एक स्पेशल पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट चर्चेत आली आहे.

अमृता खानविलकर हिने चंद्रमुखी चित्रपटातील बाई गं या गाण्यावरील तिचा आणि आशिष पाटीलच्या डान्सचा व्हिडीओ शेअर केला आहे. तिने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, आशु, तुला मी पहिल्यांदा एका हिंदी शोमध्ये नाचताना पाहिले होते तेव्हाच मनात ठरवले होते. याला गाठायचे आणि सांगायचं काय रे बाबा तुझी पॅशन. तुझा ग्रेस, मी फिदा झाले तुझ्यावर.


तिने पुढे म्हटले की, मग आपली भेट झाली आणि मी ते तुला सांगितले ही आणि आजपर्यंत सांगतेय आणि या पुढेही सांगत राहणार. अनेक शोजमधून आपण एकत्र काम केले. मग लॉकडाउनमध्ये आपण अमृतकला करायचे ठरवले आणि मी मनातल्या मनात तुला गुरु मानू लागले. तुझ्या पॅशनने.कलेच्या साधनेने मला वेड लावलं...मी विचार करायचे मी कधी आशु सारखी नाचणार....


आज प्रेक्षक चंद्रमुखी सिनेमा मधले बाई ग बघतात आणि प्रचंड कौतुक करतात ठेहरावच.... हाव भावांचं.... आणि हे सगळे शक्य झाले तुझ्यामुळे आशु .... तू जशी दिशा दाखवलीस तशी चालत गेले तुझे या टप्यावर मी जरूर आभार मानीन पण आपल्याला अजून खूप काही करायचे आहे. so let’s rock ashu ….in your style, असे तिने पोस्टमध्ये म्हटले. याशिवाय तिने आर्या आंबेकर, अजय अतुल आणि गुरू ठाकूर यांचे विशेष आभार मानले आहेत. 

Web Title: 'I fell in love with you', Amrita Khanvilkar's post discusses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.