मी खूप भाग्यवान आहे - उर्मिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2016 11:13 IST2016-11-24T10:35:56+5:302016-11-24T11:13:56+5:30

प्रत्येकजण एका छान क्षणाची वाट पाहत असतो. तो दिवस उजाडला की, त्यांचा आनंदाचा पारा उरत नाही. ती व्यक्ती एकदमच ...

I am very fortunate - Urmila | मी खूप भाग्यवान आहे - उर्मिला

मी खूप भाग्यवान आहे - उर्मिला

रत्येकजण एका छान क्षणाची वाट पाहत असतो. तो दिवस उजाडला की, त्यांचा आनंदाचा पारा उरत नाही. ती व्यक्ती एकदमच आनंदी दिसत असल्याचे पाहायला मिळत असते. असेच काहीशी गोष्ट अभिनेत्री उर्मिला कानिटकर-कोठारे हिच्याबाबतीत घडली आहे. झाले असे की, प्रेक्षकांचा लाडका अभिनेता स्वप्नील जोशी याला मुलगी झाली असल्याचे सर्वानाच माहिती आहे. तसेच त्याच्या गोंडस मुलीचे नाव मायरा असे आहे. मायरा साधारण तीन ते चार महिन्यांची असेल. अशा या  गोंडस परीला भेटण्यासाठी प्रत्येक कलाकार हा उत्सुक असणार आहे हे मात्र नक्की. या लिस्टमध्ये अभिनेत्री उर्मिला कोठारे हिचादेखील समावेश होता. पण उर्मिलाने आपली मायराला भेटण्याची ही उत्सुकता नुकतीच पूर्ण केलेली दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण तिने या मायरासोबतचा सुंदर फोटो सोशलमिडीयावरअपलोड केला आहे. तसेच मी खूप भाग्यवान आहे की, मला या गोंडस परीला भेटण्याची संधी मिळाली असल्याच्या तिने आपल्या अपडेट केलेल्या स्टेटसमधून सांगितले आहे. तिच्या या फोटोमध्ये स्वप्नील जोशी,मायरा आणि उर्मिला खरचं खूप सुंदर दिसत आहे. सोशलमीडियावर त्यांच्या या फोटोला भरभरून लाइक्सदेखील मिळताना दिसत आहे. तसेच उर्मिलाचा हा आनंद तिच्या फोटोमधून व्यक्त होतानादेखील दिसत आहे. तसेच यापूर्वीदेखील अभिनेत्री सई ताम्हणकर हिने मायराला भेटण्यासाठी  औरंगाबाद गाठले होते. त्यावेळी नुकतेच या परीचे आगमन झाले होते. सईदेखील मायरा भेटून सातवे आँसमान पे पोहोचली होती. त्याचबरोबर यापूर्वी स्वप्नील आणि उर्मिलाची जोडी प्रेक्षकांना दुनियादारी या चित्रपटातून पाहायला मिळाली होती. त्यांची ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीसदेखील उतरली होती. 

Web Title: I am very fortunate - Urmila

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.