2BHk फ्लॅटच माझ्यासाठी माझा 'राजमहल', सोनाली कुलकर्णीच्या उत्तराने जिंकली चाहत्यांची मनं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 07:48 PM2021-05-20T19:48:08+5:302021-05-20T20:04:57+5:30

कोरोनाची सद्यपरिस्थिती पाहता सोनाली कुलकर्णीने दुबईमध्ये कुणाल बेनोडेकरसह लग्न करत आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे.

I Am Happy With 2 bhk flat Sonalee Kulkarni Answer Won hearts of Fans | 2BHk फ्लॅटच माझ्यासाठी माझा 'राजमहल', सोनाली कुलकर्णीच्या उत्तराने जिंकली चाहत्यांची मनं

2BHk फ्लॅटच माझ्यासाठी माझा 'राजमहल', सोनाली कुलकर्णीच्या उत्तराने जिंकली चाहत्यांची मनं

googlenewsNext

लॉकडाउनमुळे सर्वसामान्यांसोबतच सेलिब्रिटीसुद्धा घरीच बसले आहेत. सर्व शूटिंग रद्द झाल्यामुळे त्यांना आता कुटुंबीयांसोबत मनसोक्त वेळ घालवण्याची संधी मिळाली आहे. लॉकडाउनमध्ये सोनाली कुलकर्णीने देखील तिचे लॉकडाऊन रुटींन चाहत्यांसमोर शेअर केले होते. लॉकडाउन दरम्यान घरात वेगवेगळ्या गोष्टी करण्यात व्यस्त असायची. ते सगळे व्हिडीओ आणि फोटो  सोनालीने चाहत्यांसह शेअर केले होते. यावरुन चाहत्यांना तिच्या घराचीही झलक पाहायला मिळाली. सोनालीच्या लग्झरीयस  घराची झलक पाहिल्यानंतर सध्या सोशल मीडियावर तिच्या घराचीदेखील चर्चा रंगली आहे.

Also Read:  (दुबईच्या आलिशान घरात सोनाली कुलकर्णीचा सुखी संसार सुरु, पहिल्यांदाच पाहा तिच्या घराची खास झलक)

नुकतेच कुणाल बेनोडेकरसह दुबईत सोनाली लग्नबंधनात अडकली. वाढदिवसाच्या दिवशी लग्न झाल्याची बातमी चाहत्यांसह शेअर करताच शुभेच्छांचा वर्षाव झाला. पहिल्या लॉकडाऊन दरम्यान फेब्रुवारी 2020 मध्ये सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकरचा साखरपुडा पार पडला होता.

साखरपुड्याची बातमीही तिने वाढदिवसाचं निमित्त साधत लॉकडाऊनच्या काळातच सोशल मिडीयाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली होती. त्यादिवसानंतर सोनाली लग्न कधी करणार याकडेच लक्ष लागले होते. कोरोनाची सद्यपरिस्थिती पाहता सोनालीनेही साध्या पद्धतीने लग्न करत आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे. 

सोनाली लग्नामुळे चर्चेत असताना तिच्या घरावरही चर्चा रंगत आहेत. सोशल मीडियावर आलिशान घरावर रंगलेल्या चर्चेवर आता सोनाली कुलर्णीनेही सोशल मीडियावर सांगितले की, राजमहल वैगेर असे काही नाही, आमचे  2BHK Flat आहे. हो पण आम्ही सुखी निरोगी आणि समाधानी आहोत. त्यामुळे आमच्यासाठी हाच आमचा महल असे म्हणत सोनालीने पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली आहेत.


सोनाली कुलकर्णीने आज तिच्या मेहनतीने मराठी चित्रपटसृष्टीत तिचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिने 'बकुळा नामदेव घोटाळे' या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. तिने मराठीत एकाहून एक हिट चित्रपट दिले असून हिंदी चित्रपटातही तिने काम केले आहे. 'नटरंग' या चित्रपटातील अप्सरा आली हे तिचे गाणे प्रचंड गाजले होते.

या चित्रपटानंतर तिला मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सराच म्हटले जाते. तिने अंजिठा, पोस्टर गर्ल, झपाटलेला २, मितवा, क्लासमेट यांसारख्या चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. बकुळा नामदेव घोटाळे या तिच्या पहिल्या चित्रपटासाठी तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले होते.

Web Title: I Am Happy With 2 bhk flat Sonalee Kulkarni Answer Won hearts of Fans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.