गेला उडतची शंभरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2017 16:08 IST2017-01-12T12:59:03+5:302017-01-12T16:08:06+5:30

रंगभूमीवर १०० प्रयोगांचा टप्पा गाठणं कोणत्याही नाटकासाठी अभिमानाची बाब असते. हा मान आता  अभिनेता सिद्धार्थ जाधवची प्रमुख भूमिका असलेल्या ...

Hundreds of flights | गेला उडतची शंभरी

गेला उडतची शंभरी

गभूमीवर १०० प्रयोगांचा टप्पा गाठणं कोणत्याही नाटकासाठी अभिमानाची बाब असते. हा मान आता  अभिनेता सिद्धार्थ जाधवची प्रमुख भूमिका असलेल्या केदार शिंदे दिगदर्शित 'गेला उडत' या नाटकाला मिळत आहे. बेला शिंदे यांच्या थर्डबेल प्रॉडक्शन्स व प्रसाद कांबळी यांच्या भद्रकाली प्रॉडक्शन्स यांच्या संयुक्त विद्यमानाने या नाटकाची निर्मिती केली असून या नाटकाचा १००वा प्रयोग रविवार १५ जानेवारीला दु.४ वाजता शिवाजी मंदिर नाट्यगृहात संपन्न होणार आहे. ‘गेला उडत’ ही भद्रकाली प्रॉडक्शन्सची ५३वी नाट्यकृती आहे. मराठी रंगभूमीला सुपरहिट नाटकं दिलेल्या केदार शिंदे यांनी या नाटकाचं लेखन दिग्दर्शन केलं आहे.  या नाटकाद्वारे सिद्धार्थ जाधव बऱ्याच काळानं रंगभूमीवर परतला. त्याच्या नेहमीच्या शैलीतला निखळ विनोद आणि धमाल कथानक हे 'गेला उडत'चं वैशिष्ट्य . पहिल्या प्रयोगापासूनच प्रेक्षकांनी या नाटकाला भरभरून दाद दिली आहे. दिग्दर्शक विजय केंकरे, अभिनेते अशोक सराफ, भरत जाधव, अंकुश चौधरी, अमोल कोल्हे यांसारख्या मान्यवर मंडळींनीही नाटकाचं कौतुक केलं आहे. मारुती हा तरुण लहानपणापासूनच मारुतीच्या लीलांनी प्रभावित आहे. आपल्यातही मारुतीसारखी शक्ती आली आहे, असं त्याला वाटतं. स्वतःला तो मारुतात्मज म्हणवतो. घरच्या अडचणी आपण लीलया सोडवू अशी त्याची कल्पना असते. त्याला समजून घेता घेता त्याच्या घरच्यांच्या अडचणी वाढतात. शेवटी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागतं. तिथली कौन्सेलर डॉ. सायली त्याला तो सामान्य माणूस असल्याची आणि त्याच्याकडे कुठलीही सुपर नॅचरल पॉवर नसल्याची जाणीव करून देते. सामान्यपणाची जाणीव झालेला मारुती घरच्या अडचणी कशा सोडवतो असं नाटकाचं कथानक आहे.

Web Title: Hundreds of flights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.