Hundred Trailer: लारा दत्तासह झळकणार रिंकू राजगुरू, हिंदीतील बड्या कलाकारांसह करते अभिनय
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 12:25 IST2020-04-25T12:25:04+5:302020-04-25T12:25:48+5:30
सैराट गर्ल रिंकू राजगुरूने अल्पावधीतच तुफान लोकप्रियता मिळवली आहे. तिची लोकप्रियता पाहाता अनेकांना तिने आपल्याही प्रोजक्टमध्ये काम करावी अशी ईच्छा बाळगून असतात.

Hundred Trailer: लारा दत्तासह झळकणार रिंकू राजगुरू, हिंदीतील बड्या कलाकारांसह करते अभिनय
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू आहे. लोकांना एवढे दिवस घरी थांबण्याची सवय नाही. शासन निवेदनातून, जाहिरातीतून जनजागृती करत आहे की बाहेर पडू नका, सारखे मास्क बांधा, वारंवार हात स्वच्छ धुवा, सॅनिटायझर वापरा पण असे अनेकदा अनेकांनी सांगूनही अनेक लोक याकडे दुर्लक्ष करत आहेत आणि यामुळे हा रोग पसरत आहे. असे होवू नये घरात बसून कंटाळा आला असेल म्हणून आता नवीन वेबसिरीजच्या माध्यमातून रिंकू राजगुरूलारा दत्तासह रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.
सैराट गर्ल रिंकू राजगुरूने अल्पावधीतच तुफान लोकप्रियता मिळवली आहे. तिची लोकप्रियता पाहाता अनेकांना तिने आपल्याही प्रोजक्टमध्ये काम करावी अशी ईच्छा बाळगून असतात. आता रिंकूला बडा प्रोजेक्ट मिळाला आहे. अर्थात हा सिनेमा नसला तरी हंड्रेड नावाची वेबसिरीजमध्ये ती झळकणार आहे. यात अनेक नामवंत कलाकारांसह ती स्क्रीन शेअर करत आहे. विशेष म्हणजे लारा दत्तासह तिची केमिस्ट्री खूप चांगली जुळल्याचे पाहायला मिळत आहे. या वेबसिरीजमध्ये लारा दत्ता एसीपी सौम्या शुक्लाच्या भूमिकेत झळकणार असून या भूमिकेत परफेक्शन आणण्यासाठी महिला पोलिसांकडून तिने खास टीप्स घेत ही भूमिका साकरली आहे.
स्विज्झर्लंड एकदा तरी पाहण्याचे स्वप्न उराशी बाळगणारी रिंकूला अचानक ब्रेन ट्युमरचा आजार होतो. आणि अगदी जगण्यासाठी कमी वेळ तिच्यासाठी असतो. अशात ती पोलिस इन्सपेक्टर बनलेली लारा दत्तासह काम करायला सुरूवात करते आणि त्यानंतर कशा रितीने तिच्या स्वप्नांना ती भरारी देते अशा आशयाची ही कथा आहे. नुकताच या वेबसिरीजचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे.
अवघ्या काही वेळातच सोशल मीडियावर हा ट्रेलर सुपरहिट ठरतो आहे. येत्या २५ एप्रिलला ही वेबसिरीज रसिकांच्या भेटीला येणार असून काहीशी दुरावलेली आपल्या सा-यांची आवडती रिंकूला अशा माध्यमातून पाहणे हे नक्कीच मनोरंजनची पर्वणीच ठरणार आहे.