लग्न हाच सेटल होण्याचा निकष कसा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2016 18:42 IST2016-07-23T13:07:54+5:302016-07-23T18:42:16+5:30
Exculsive - बेनझीर जमादार जगात नंबर वन असणारी खेळाडू सानिया मिर्झा हिला एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आलं ...

लग्न हाच सेटल होण्याचा निकष कसा?
जगात नंबर वन असणारी खेळाडू सानिया मिर्झा हिला एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आलं की, तू सेटल कधी होणार? यावर सानियाने अत्यंत शांततेत अप्रतिम उत्तर दिले की, तुम्ही मुलगी सेटल होणं म्हणजे नेमकी काय समजता. सर्वोत्तम कामगिरी करा, जगात नंबर वन रहा, सर्वोत्तम करिअर करा तरी मुलींच सेटल होणं काय असतं. असो, पण आपल्याकडे सेटल होण्याच्या अटी वेगळयाच आहेत. खरचं आज २१ व्या शतकातदेखील मुलगी सेटल होणं म्हणजे लग्न,चूल आणि मूल हेच आहे का. सानियाच काय विविध क्षेत्रातील अनेक महिला आहेत की, त्यांना साहजिकच अशा अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते. मराठी इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्रीदेखील आहेत की, त्यांना देखील अशा प्रश्नांना सामोरे जावे लागले. सेटल होणं म्हणजे काय? समाज २१ व्या शतकात असून देखील विचारांच्या बाबतीत एवढा मागसलेला कसा अशा अनेक गोष्टीबाबत मराठी इंडस्ट्रीच्या सुंदर अभिनेत्रींना लोकमत सीएनएक्सशी साधलेला संवाद.
तेजस्विनी पंडीत : हो,मलादेखील बहुतांशी वेळा या प्रश्नाला सामोरे जावे लागचं. ज्या संस्कारात व देशात आपण वाढतो तिथे स्त्रीच आस्तित्व फक्त लग्न व मूल यामध्येच ती सेटल झाली अशी गणती केली जाते. पण मी व माझी फॅमिलीदेखील या विचाराचे नाही. एका स्त्रीचं पूर्णत्व हे तिच्या आई होण्यावरून किवा लग्न करण्यावरून नक्कीच नसतं. तिला तेवढाच हक्क जेवढा पुरूषाला आहे. तसेच माझ्या दृष्टीने हा जमाना आता उरलेला नाही की, स्त्री फक्त वंश वाढविण्यासाठीच आहे. तसेच दुसºयाच क्षणी असे ही वाटते की, तो हाच जमाना आहे की, जिथे सानियाला असा प्रश्न विचारला जातो. या २१ व्या शतकात समाज फक्त दिवंडीच पेटतो की, आपण खूप पुढारलेलो आहोत. पण जेव्हा प्र्रत्यक्षात त्या परिस्थितीची वेळ येते तेव्हा खरचं ते दिसून येते की आपण किती मागासलेले आहोत हे दिसून येते.
अमृता खानविलकर : सानियाने खरचं अप्रतिम उत्तर दिलं आहे. ती मुलगी आज यशाच्या एवढया मोठया शिखरावर पोहोचलेली आहे. तरी तिला अशा प्रश्नांना सामोरे जावे लागते म्हणजे काय? तसेच सानियाप्रमाणे इतर क्षेत्रात देखील मुली उच्च स्थानावर आहे पण त्यांचे कर्तृत्व फक्त लग्न आणि मुलं यावर ठरू नये. आता तुम्ही म्हणाल की, सगळयाच मुली सानियाच असतात का? पण आपण सामान्य मुलींचा विचार केला, त्यांना हा प्रश्न विचारला तर त्या म्हणतील आई-वडिल पाहात आहे. मान्य की, हे प्रश्न समाजाला पडतात. पण आता समाजाने आपला पाहण्याचा दृष्टिकोन बदलला गेला पाहिजे. आता आपण २१ व्या शतकात जगत आहोत. काळ बदलला आहे. मुलीदेखील आता बदलत आहेत. समाज एक प्रगतीच्या दिशेने पाउल टाकत आहे. त्यामुळे महिलांना असे प्रश्न विचारून त्यांच्यातील आत्मविश्वास कमी करू नये. मी एवढेच म्हणेल की, फक्त समाजाचा नजरियाँ बदलणे आवश्यक आहे.
प्रिया बापट : मुलगी सेटल होणं म्हणजे काय? हा प्रश्न सानियाच काय सगळयाच मुलींना फेस करावा लागतो. समाजाच्या या प्रश्नाबाबत मला असेच म्हणावे वाटते की, लग्न व मूल होऊन देण ही प्रत्येकाची वैयक्तिक इच्छा व गरज आहे. तसेच समाजात आई-वडिल होतात की नाही यावरून कोणच्या ही कर्तृत्वाची व्याख्या करू नये. हे प्रत्येकाच्या वागण्याने, बोलण्याने व कृतीने ठरलं गेलं पाहिजे. तसेच लग्न व मूल होण्यापेक्षा ही चांगला माणूस होणे आवश्यक आहे. भले ते मुलगा असो या मुलगी. ते आणि तेवढचं म्हणजे सेटल होण नव्हे तिच्या कामगिरीविषयी व कतृर्त्वाविषयी चर्चा होणे ही आवश्यक आहे.
उर्मिला कानिटकर: हो, मला देखील अशा प्रश्नांना फेस करावे लागते. पुर्वी हे वास्तव होत की मुली सेटल होणं म्हणजे लग्न, चुल आणि मुलं, पण आता हे चित्र थोडे फार प्रमाणात बदलताना दिसत आहे. माझ्या मते, स्त्री सेटल होणं म्हणजे, स्वत:ची जबाबदारी स्वत: घेणे, कोणावरही अवलंबून न राहणे. समाजाने देखील स्त्रीची सेटल होण्याची व्याख्या बदलणे किंवा दृष्टीकोन बदलणे गरजेचे आहे.