भय चित्रपट होणार २४ मार्चला प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2017 09:32 AM2017-02-23T09:32:18+5:302017-02-23T15:02:18+5:30

राहूल भातणकर दिग्दर्शित भय या चित्रपटाला अखेर मुहुर्त लागला आहे. मध्यंतरी काही कारणामुळे या चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्यात आली ...

The horror movie will be screened on March 24 | भय चित्रपट होणार २४ मार्चला प्रदर्शित

भय चित्रपट होणार २४ मार्चला प्रदर्शित

googlenewsNext
हूल भातणकर दिग्दर्शित भय या चित्रपटाला अखेर मुहुर्त लागला आहे. मध्यंतरी काही कारणामुळे या चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. आता हा चित्रपट २४ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयी असणारी प्रेक्षकांची उत्सुकता संपली आहे. 5 जी एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि सचिन कटारनवरे निर्मित भय हा चित्रपट आहे. या चित्रपटात अभिनेता अभिजीत खांडकेकर हा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. अभिजीतसोबत या चित्रपटात अभिनेत्री स्मिता गोंदकरदेखील दिसणार आहे. अभिजित या चित्रपटात एक हटके भूमिका साकारणार आहे. त्याला या चित्रपटात  स्क्रीझोफ्रेनिया हा आजार दाखवण्यात आला आहे. त्याचबरोबर ज्यामुळे त्याच्या मनात सतत एक भीती असते. भीती ही प्रत्येकाच्या मनात असते. ही भीती मनात ठेऊन जगणाºया व्यक्तींना कोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागते याचा गुंतवून टाकणारा प्रवास या चित्रपटात पहायला मिळणार आहे. या दोन कलाकारां व्यतिरिक्त सतीश राजवाडे, उदय टिकेकर, संस्कृती बालगुडे, विनीत शर्मा, सिद्धार्थ बोडके, शेखर शुक्ला, धनंजय मांद्रेकर, नुपूर दुधवाडकर या कलाकारांच्यादेखील समावेश आहे. तसेच  या चित्रपटाचे सहनिमार्ते अजय जोशी असून आशिष चौहान कार्यकारी निमार्ता आहेत. कथा पटकथा संवाद नितीन विजय सुपेकर यांचे आहेत. कलादिग्दर्शन प्रशांत राणे यांचे आहे. नृत्यदिग्दर्शक अजय देवरुखकर असून सिनेमॅटोग्राफर राजेश राठोर आहेत. तसेच या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना अभिजीत खांडकेकर आणि स्मिता गोंदकर हे दोन कलाकार पहिल्यांदा एकत्रित झळकणार आहे. म्हणूनच  चला तर भय या चित्रपटासाठी प्रेक्षकांना आणखी थोडे दिवस वाट पाहावी लागणार हे नक्की. 

Web Title: The horror movie will be screened on March 24

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.