भय या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2016 12:32 IST2016-10-12T13:06:19+5:302016-10-20T12:32:29+5:30
राहुल भाटनकर दिग्दर्शित भय या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होती. अखेर या चित्रपटाचा पोस्टर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या ...

भय या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित
ाहुल भाटनकर दिग्दर्शित भय या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होती. अखेर या चित्रपटाचा पोस्टर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात अभिनेता अभिजीत खांडकेकर आणि स्मिती गोंदकर यांची प्रमुख भूमिका असणार आहे. या दोघांच्या पोस्टरवरील या सुंदर फोटोने सोशल मीडियावर भरभरून लाइक्स व कमेंन्ट मिळविले आहेत. हा चित्रपटात स्क्रीझोफ्रेनिया या एका गंभीर मानसिक आजाराविषयी सांगितले आहे. तसेच या आजाराविषयी समाजातदेखील भय आहे. म्हणून समाजात या आजाराविषयी जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न भय या चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा नितीन सुपेकर यांनी लिहीली आहे. चित्रपटाची गीते शेखर अस्तीत्व यांनी लिहली असून अजित-समीर यांनी संगीत दिलं आहे. तसेच या चित्रपटात सतीश राजवाडे,संस्कृती बालगुडे, उदय टिकेकर, विनीत शर्मा आणि सिध्दार्थ बोंडके आदी कलाकारांचादेखील समावेश आहे.
![]()