मराठमोळ््या हर्षवर्धनची रशियात क्रेझ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2016 14:43 IST2016-12-16T13:45:03+5:302016-12-16T14:43:58+5:30
हर्षवर्धन राणे हे नाव आता बॉलिवूडमध्ये चांगलेच परिचयाचे झाले आहे. समन तेरी कसम या चित्रपटातून हर्षवर्धनने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले ...

मराठमोळ््या हर्षवर्धनची रशियात क्रेझ
र्षवर्धन राणे हे नाव आता बॉलिवूडमध्ये चांगलेच परिचयाचे झाले आहे. समन तेरी कसम या चित्रपटातून हर्षवर्धनने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्याचा हाच चित्रपट शाहरुख, सलमान सारख्या हिंदी चित्रपटसृष्टीतील तगडया स्टार्ससोबत रशियन चित्रपट महोत्सवात झळकला होता. नुकताच तो या चित्रपट महेत्सवासाठी रशियाला जाऊन आला. यावेळी रशियन प्रेक्षकांनी खास करुन रशियायातील सुंदर तरुणींनी हर्षवर्धनवर भरभरुन प्रेम केले. त्याच्यासोबत फोटो काढले. रशियात हर्षवर्धनचे एकदम जंगी स्वागत झाले. अहो एवढेच नाही तर त्याला एका रशियन चित्रपटाची आॅफर देखील मिळाली आहे. यामुळे सध्या तो चांगलाच अनंदित अहे. याविषयी हर्षवर्धनने एका मुलाखतीत सांगितले, रशियातील माझा अनुभव फारच सुंदर होता. रशियन प्रेक्षकांनी सिनेमाला भरभरुन दाद दिली. बॉलिवूडमध्ये गाजलेल्या शाहरुख खानचा 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे', सलमान खानचा 'सुल्तान', राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा 'दम लगाके हयशा' यासारख्या चित्रपटांच्या पंक्तीत 'सनम तेरी कसम'ला स्थान मिळाले ही फार आनंदाची गोष्ट होती. रशियन लोकांनी तर मला खूप चांगला प्रतिसाद दिला. राज कपूर, मिथूनदा यांच्याबरोबर माझी तुलना झाल्याच्या बातम्याही मी पाहिल्या. पण एकंदरीतच खूप चांगला अनुभव होता. एका रशियन चित्रपटासाठी मला आॅफर मिळाली आहे. ही माझ्यासाठी सर्वात आनंदाची गोष्ट आहे. खरंच आहे म्हणा हर्षवर्धनने दाक्षिण्यात चित्रपसृष्टीतून पदार्पण केले. त्यानंतर बॉलिवूड चित्रपटात काम केले आता तर त्याला थेट रशियन चित्रपटाची आॅफर आली आहे. यावरुनच सध्या हर्षवर्धन चांगलाच आनंदीत असल्याचे दिसून येत आहे.