“ऑनर” मधून.... जवानांच्या "तारणहारां"ना सलाम !

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2018 06:02 AM2018-01-24T06:02:22+5:302018-01-24T11:32:22+5:30

घरापासून लांब राहून अहोरात्र फक्त देशासाठी जगत असणारे सैन्यातील जवान जीवाची पर्वा न करता देशासाठी बलिदान देतात. खरोखर कोणत्याही ...

"Honor" from "Honor" .... | “ऑनर” मधून.... जवानांच्या "तारणहारां"ना सलाम !

“ऑनर” मधून.... जवानांच्या "तारणहारां"ना सलाम !

googlenewsNext
ापासून लांब राहून अहोरात्र फक्त देशासाठी जगत असणारे सैन्यातील जवान जीवाची पर्वा न करता देशासाठी बलिदान देतात. खरोखर कोणत्याही शब्दात त्यांच्या या सेवेचे मोल केले जाणार नाही. त्यांच्या या बलिदानात कुटुंबियांचा देखील मोलाचा वाटा आहे. काळजावर दगड ठेवून त्यांचे कुटुंबीय जगत असतात. बॉर्डरवर त्यांच्या शौर्य गाथेसाठी त्यांना अनेक शौर्य पदक आणि मेडल्स दिली जातात.
 
या सर्व मेडल्स आणि पदकांहून अधिकच त्यांचे मोल आहे. बॉर्डरवर त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून आर्मी डॉक्टर्स देखील अहोरात्र काम करत असतात. जीवाची पर्वा न करता शत्रूसोबत सामना करणाऱ्या जवानाला तेवढयाच प्रयत्नाने आर्मी डॉक्टर्स मृत्युच्या दाढेतून वाचवत असतात. आर्मी डॉक्टर्स देखील तेवढयाच कठीण परिस्थितीत राहून देशसेवा करत असतात, परंतु कधी कधी ते पदक आणि मेडल्स पासून दूर असतात. फक्त आर्मी डॉक्टर्सच नाहीत तर वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक जण त्यांच्या त्यांच्या प्रकारे त्यांच्या कामाच्या माध्यमातून देशसेवा करत असतात...ज्याची माहिती देखील आपल्याला नसते.  मुळ संकल्पना रोहित भागवत, संकल्पना विस्तार रोहित भागवत, निखील रायबोले, भूपेंद्रकुमार नंदन. यात यशोधन टक, अनिल छत्रे आणि गीता धुरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. छायांकन प्रथमेश चांदेकर यांनी केले आहे. सदर व्हिडिओ युट्यूबवर आणि मोबाईल अॅपवर मोफत बघता येणार आहे. त्यामुळे येत्या २६ जानेवारीला देशाच्या रक्षणासाठी झगडणाऱ्या जवानांना तर सलाम करूयाच. पण त्याबरोबरच त्यांना हजारो जखमांमधून वाचविणाऱ्या डॉक्टरांनाही विसरुया नको..
 

Web Title: "Honor" from "Honor" ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.