'होम स्वीट होम’चा हृदयस्पर्शी टीजर प्रदर्शित,या कलाकरांच्या असणार भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 11:58 IST2018-08-31T11:57:30+5:302018-08-31T11:58:30+5:30

३५ वर्षे एकाच घरात वास्तव्य केलेल्या दाम्पत्याच्या मनात घराविषयी असणारे स्थान टीझरमध्ये उल्लेखिले आहे. टीझरच्या शेवटी प्रसाद ओक, विभावरी देशपांडे आणि हृषीकेश जोशी दारातून डोकावताना दिसतात. या अत्यंत हृदयस्पर्शी टीजर मधून ‘होम स्वीट होम’ बद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्कंठा निर्माण झाली आहे.

Home Sweet Home New Marathi Movie Teaser Released | 'होम स्वीट होम’चा हृदयस्पर्शी टीजर प्रदर्शित,या कलाकरांच्या असणार भूमिका

'होम स्वीट होम’चा हृदयस्पर्शी टीजर प्रदर्शित,या कलाकरांच्या असणार भूमिका

फ्रेम्स प्रॉडक्शन्स कंपनी प्रा. लि. निर्मित आणि प्रोऍक्टिव्ह व स्वरूप रिक्रीएशन्स अँड मिडिया प्रा. लि. प्रस्तुत ‘होम स्वीट होम’ या मराठी चित्रपटाचा हृदयस्पर्शी टीजर नुकताच सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आला. यामध्ये ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि रीमा यांची अफलातून केमीस्ट्री बघायला मिळते. ‘होम स्वीट होम’ या चित्रपटाच्या टीजरमध्ये रीमा आणि मोहन जोशी यांच्या नात्याचा गोडवा विषद केला आहे,सोबतीला सुप्रसिद्ध कवी, गीतकार वैभव जोशी यांची‘नात्याचे रुटीन चेकअप’ सांगणारी त्यांच्याच आवाजातील सुंदर कविता आहे.

नात्यात संवादाचे प्रेशर जपणे असेल, खाण्यासंबंधीचे पथ्य असेल, अथवा दाम्पत्यातील खट्याळपणा असेल, अशा सर्वच बाबी टीजर मध्ये कवितेच्या रूपाने सादर केल्या आहेत. ३५ वर्षे एकाच घरात वास्तव्य केलेल्या दाम्पत्याच्या मनात घराविषयी असणारे स्थान टीझरमध्ये उल्लेखिले आहे. टीझरच्या शेवटी प्रसाद ओक, विभावरी देशपांडे आणि हृषीकेश जोशी दारातून डोकावताना दिसतात. या अत्यंत हृदयस्पर्शी टीजर मधून ‘होम स्वीट होम’ बद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्कंठा निर्माण झाली आहे.

 

अभिनेता, लेखक हृषीकेश जोशी ‘होम स्वीट होम’ मधून दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहे, या चित्रपटात दिवंगत अभिनेत्री रीमा तसेच मोहन जोशी, हृषीकेश जोशी, स्पृहा जोशी, प्रसाद ओक, विभावरी देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘होम स्वीट होम’ ची कथा हृषीकेश जोशी, वैभव जोशी, मुग्धा गोडबोले यांची आहे,संगीतकार नरेंद्र भिडे, संतोष मुळेकर यांनी कवी,गीतकार वैभव जोशी यांच्या गीतांना स्वरबद्ध केले आहे. हेमंत रुपरेल आणि रणजीत ठाकूर हे चित्रपटाचे निर्माते तर नितीन प्रकाश वैद्य कार्यकारी निर्माते असून आकाश पेंढारकर, विनोद सातव, सचिन नारकर आणि विकास पवार हे प्रस्तुतकर्ते आहेत. आयुष्यात आपल्या घराचं स्थान काय असतं हे विषद करताना जीवनातील अनेक पैलूंवर प्रकाश टाकणारा अत्यंत हटके असा ‘होम स्वीट होम’ येत्या २८ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: Home Sweet Home New Marathi Movie Teaser Released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.