हे पाहा.... 'झिंगाट' गाण्याचं कन्नड व्हर्जन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2017 12:09 IST2017-02-23T06:39:23+5:302017-02-23T12:09:23+5:30

झिंगाट या गाण्याचे कन्नड व्हर्जनदेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटिला येणार आहे.

Hey .... Kannada version of the song 'Zingat' | हे पाहा.... 'झिंगाट' गाण्याचं कन्नड व्हर्जन

हे पाहा.... 'झिंगाट' गाण्याचं कन्नड व्हर्जन

गराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविले आहे. एवढेच नाही तर,या चित्रपटाने जागतिक पातळीवर ही यश मिळविले आहे. या चित्रपटाचे यश पाहता, सैराट चित्रपटाचा कन्नड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटिला येणार आहे. या चित्रपटामध्ये प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू झळकणार आहे. हा चित्रपट फ्रेबुवारीमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र आर्चीच्या दहावीच्या परिक्षेमुळे या चित्रपटाची प्रदर्शित तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आता हा चित्रपट मार्च महिन्याच्या अखेरीस प्रदर्शित होणार असल्याचे समजत आहे. 
         
    सैराट चित्रपटातील प्रत्येक गाण्याने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. आज ही या चित्रपटातील गाणी कल्ला करताना दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातील झिंगाट गाण्याने तर संपूर्ण महाराष्ट्रात सैराटमय वातावरण निर्माण केले आहे. लग्न असो या पार्टी सर्व उत्साहाच्या ठिकाणी झिंगाट हे गाणे सातत्याने वाजत असल्याचे पाहायला मिळते. आता याच गाण्याचे कन्नड व्हर्जनदेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटिला येणार आहे. नुकतेच कन्नडमध्ये 'सैराट'च्या रिमेकचं शूटींग पूर्ण झालंय. या चित्रपटातील 'झिंगाट' गाण्याचं कन्नड व्हर्जन व्हायरल झाले आहे. सोशलमीडियावर या कन्नड व्हर्जनला प्रचंड प्रमाणात पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. या चित्रपटात रिंकूसोबतच अभिनेता सत्यप्रकाश यांचा मुलगा निशांत दिसणार आहे. या कन्नड रिमेकचे नाव 'मनसु मल्लिगे'आहे. चला तर पाहूयात हा चित्रपट सैराटप्रमाणेच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो का. त्यासाठी आणखी थोडे दिवस वाट पाहावी लागणार हे नक्की. 

Web Title: Hey .... Kannada version of the song 'Zingat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.