हेमंत म्हणतोय रंगपंचमी खेळणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2016 15:21 IST2016-03-22T22:21:24+5:302016-03-22T15:21:24+5:30

          सेलिब्रिटीजवर त्यांच्या चाहत्यांची चांगलीच करडी नजर असते असे म्हणायला खरच काही हरकत नाही. कारण ...

Hemant says that Rangpanchami will not play | हेमंत म्हणतोय रंगपंचमी खेळणार नाही

हेमंत म्हणतोय रंगपंचमी खेळणार नाही


/>          सेलिब्रिटीजवर त्यांच्या चाहत्यांची चांगलीच करडी नजर असते असे म्हणायला खरच काही हरकत नाही. कारण आपला आवडता कलाकार काय करतो, काय खातो काय बोलतो अशाप्रकारच्या सर्वच गोष्टी त्यांना जाणुन घ्यायच्या असतात.  कलाकारांनी एखादी गोष्ट सांगितली तर त्यांना फॉलो करणारेही त्यांचे असंख्य चाहते आपल्याला पहायला मिळतात आणि म्हणुनच एखाद्या गोष्टी विषयी जनजागृती करायची असल्यास या कलाकारांचा संदेश लाखमोलाचा ठरतो कारण त्यांना फॉलो करणारे त्यांचे करोडो चाहते असतात.
          हेमंत ढोमे देखील जागतिक जलदिनाच्या निमित्ताने असाच एक सामाजिक संदेश देत म्हणत आहे, माझ्या शेतकरी बांधवांना प्यायला पाणी नाही . मी माझ्या कुटूंबासहित यंदा रंगपंचमी खेळणार नाही. हेमंतचा हा सामाजिक संदेश त्याचे चाहते नक्कीच फॉलो करतील आणि यंदाची रंगपंचमी एकमेकांवर सुखाच्या रंगांची उधळण करुन साजरी करतील अशी आपण आशा करुयात.

Web Title: Hemant says that Rangpanchami will not play

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.