हेमंत ढोमेला करायच्या विविधांगी भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2017 11:39 IST2017-02-12T06:09:49+5:302017-02-12T11:39:49+5:30

अभिनेता हेमंत ढोमे याने नुकतेच बघतोस काय मुजरा या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली होती. खलनायकाची भूमिका करणारा हा त्याचा ...

Hemant Dhoomla's diverse role to do | हेमंत ढोमेला करायच्या विविधांगी भूमिका

हेमंत ढोमेला करायच्या विविधांगी भूमिका

िनेता हेमंत ढोमे याने नुकतेच बघतोस काय मुजरा या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली होती. खलनायकाची भूमिका करणारा हा त्याचा पहिलाच चित्रपट होता. पहिल्यांदा त्याने आपल्या विनोदी शैलीच्या भूमिकांना छेद देऊन काहीतरी नवीन करण्याचा हा प्रयत्न होता. आता मात्र त्याचा हा प्रयत्न यशस्वी झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच्या या चित्रपटातील त्याची खलनायकाची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. त्याच्या या भूमिकेविषयी हेमंत ढोमे लोकमत सीएनएक्सला सांगतो, खरं तर या चित्रपटात मी भूमिका करणारच नव्हतो. ही भूमिका योगायोगानं माज्याकडे आली आहे. खलनायकाची भूमिका साकारणाºया त्या अभिनेत्याचा अपघात झाला होता. त्याला एक महिना आराम करण्यास सांगण्यात आले. यानंतर मी सर्व कलाकारांना फोन केले. मात्र सगळयांचे शेडयुल्ड टाइट होते. त्यामुळे ही भूमिका करण्याचा मीच निर्णय घेतला. आणि तो यशस्वी झाला याचा आनंद होतो. माज्या या अभिनयाचे सर्वानी कौतुक केले आहे. त्यामुळे आता आपल्या विनोदी भूमिकेतून बाहेर येऊन विविधांगी भूमिका करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर पुन्हा मला खलनायकाची भूमिका करण्यासदेखील आवडेल असे देखील तो यावेळी म्हणाला. हेमंतने मराठी चित्रपटसृष्टीला अनेक सुपरहीट चित्रपट दिले आहेत. जय जय महाराष्ट्र माझा, आंधळी कोशिबिंर, मगलआष्टक वन्स मोअर, आॅनलाइन बिनलाइन अशा अनेक चित्रपटांचा यात समावेश आहे. सध्या त्याचा बघतोस काय मुजरा कर हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. त्याने दिग्दर्शन आणि अभिनय या दोन्हींच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनं जिंकले आहे. 

Web Title: Hemant Dhoomla's diverse role to do

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.