बिग बजेट सिनेमांवर 'झिम्मा २' पडला भारी! सिद्धार्थ म्हणतो, "मोठ्या सिनेमांनी दबाव टाकण्याच प्रयत्न केला, पण..."

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 09:57 AM2023-12-21T09:57:07+5:302023-12-21T09:57:41+5:30

पाचव्या आठवड्यातही 'झिम्मा २'ची यशस्वी घोडदौड सुरूच आहे. बॉलिवूड सिनेमांना 'झिम्मा २'ने दिलेली टक्कर पाहून सिद्धार्थ चांदेकरही भारावून गेला आहे.

hemant dhome jhimma 2 success siddharth chandekar shared special post | बिग बजेट सिनेमांवर 'झिम्मा २' पडला भारी! सिद्धार्थ म्हणतो, "मोठ्या सिनेमांनी दबाव टाकण्याच प्रयत्न केला, पण..."

बिग बजेट सिनेमांवर 'झिम्मा २' पडला भारी! सिद्धार्थ म्हणतो, "मोठ्या सिनेमांनी दबाव टाकण्याच प्रयत्न केला, पण..."

'झिम्मा २' हा मराठी सिनेमा २४ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. हेमंत ढोमेचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमाने पहिल्या दिवसापासूनच कोटींमध्ये कमाई करायला सुरुवात केली होती. प्रदर्शनाच्या जवळपास महिनाभरानंतरही हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर ठाण मांडून बसला आहे. मोठ्या बिग बजेट सिनेमांना 'झिम्मा २' दमदार टक्कर देताना दिसत आहे. पाचव्या आठवड्यातही 'झिम्मा २'ची यशस्वी घोडदौड सुरूच आहे. 

बॉलिवूड सिनेमांना 'झिम्मा २'ने दिलेली टक्कर पाहून सिद्धार्थ चांदेकरही भारावून गेला आहे. त्याने 'झिम्मा २'साठी खास पोस्ट शेअर केली आहे. सिद्धार्थने इन्स्टाग्रामवरुन एका होर्डिंगचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत बिग बजेट सिनेमांबरोबर 'झिम्मा २' ताठ मानेने उभा असल्याचं दिसत आहे. हा फोटो शेअर करत सिद्धार्थने पोस्ट लिहिली आहे. 

ह्या फोटोत सगळं काही आलंय. पाच आठवडे ताठ मानेनं लढत आलेला आहे आपला झिम्मा २! मोठ्या सिनेमांनी pressurize करण्याचा प्रयत्न केला का? तर केला. shows कमी झाले का? तर झाले. पण केवळ आणि केवळ प्रेक्षकांच्या प्रेमाची ताकद, आणि एक सुंदर गोष्ट प्रेषकांना सांगण्याचा आमचा प्रयत्न यशस्वी ठरला..
अजून अनेक मोठे सिनेमे येऊन ठाकलेत. येऊदे! तुमचं प्रेम असंच टिकलं तर तुमचा झिम्मा २ पण टिकेल. आणि तुम्हाला ‘आयुष्य सुंदर आहे’ हे पुन्हा एकदा पटवून देणारे चित्रपट आम्ही बनवणं थांबवणार नाही.
मराठी चित्रपटांवर प्रेम करणाऱ्या माझ्या सर्व प्रेक्षकांचे खूप आभार! मनापासून.

सिद्धार्थबरोबरच हेमंत ढोमेनेही 'झिम्मा २'साठी खास पोस्ट लिहिली आहे. झिम्मा २चं यश पाहून हेमंत ढोमेही थक्क झाला आहे. 

आपल्या ‘झिम्मा २’ चा सगळा लढा, सारं यश या फोटोत आहे…

५ व्या आठवड्यात पदार्पण करत असताना आपल्या सिनेमाने या बलाढ्यांसोबत उभं ठाकून आपला असा हक्काचा प्रेक्षक चित्रपटगृहात आणला आणि त्यांना आनंद दिला! अजून काही वर्षांनी हाच फोटो बघून चेहेऱ्यावर समाधानाचं हसू असेल! अनेक साऱ्या आठवणींचा साठा असेल, आपण केलेल्या कामाचं समाधान असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रचंड अभिमान असेल! बास अजून काय पाहिजे?

याचं सगळं श्रेय तुमचंच… तुम्हीच कर्ते करविते!

खूप खूप धन्यवाद! 

'झिम्मा २' हा सिनेमा २०२१मध्ये प्रदर्शित झालेल्या 'झिम्मा' चित्रपटाचा सीक्वल आहे. या सिनेमात सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, निर्मिती सावंत, क्षिती जोग, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे, सायली संजीव आणि सिद्धार्थ चांदेकर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. 'झिम्मा २' ने बॉक्स ऑफिसवर १० कोटींहून अधिक कमाई केली आहे. 

Web Title: hemant dhome jhimma 2 success siddharth chandekar shared special post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.