/> पोश्टर गर्ल आठवतोय का तुम्हाला.... त्यामध्ये भारतराव झेंडेची भुमिका साकारणारा आपला रांगडा अभिनेता जितेंद्र जोशी सगळ््यांच्याच लक्षात राहिला होता. तर बजरंगची भुमिका करणारा लाजराबुजरा बज्या म्हणजेच आपला चॉकलेट बॉय अनिकेत विश्वासराव याला तरी कस काय विसरणार. तर आता हा भारतराव ,बज्या अन सगळ््यांचा लाडका हेमंत ढोमे हे त्रिकुट पुन्हा एकदा आपल्याला मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. असे आम्ही नाही तर खुद्द हेमंत ढोमे सांगत आहे. हेमंतने नूकतेच सोशल साईट्सवरुन म्हटले आहे की, कमिंग टुगेदर वेरी सुन विथ माय भारतराव अॅन्ड बजरंग. आता या तिघांची जोडी एकत्र आल्यावर किती धमाल करतेय ते पाहणे त्यांच्या चाहत्यांसाठी नक्कीच औत्स्युक्याचे ठरणार आहे. पोश्टर गर्ल मध्ये या तिघांचे ट्युनिंग तर चांगलेच जमुन आले होते. हेमंतला त्याच्या या नव्या चित्रपटाविषयी विचारले असता त्याने सीएनएक्सला सांगितले, आम्ही तिघे लवकरच एका चित्रपटात एकत्र येत आहोत. परंतू त्या चित्रपटाचे नाव काय असेल, कथानक काय असले या विषयी आम्ही आत्ताच काही सांगु शकत नाही. हेमंतने जरी चित्रपटाचे नाव गुलदस्त्यात ठेवले असले तरी आपल्या समोर येत्या काही दिवसातच या चित्रपटाचे काही पैलु उलगडतील हे मात्र नक्की.
Web Title: Hemant is coming along with Bharatav and Bajya .. soon
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.