हेमंत होतोय दिग्दर्शक... ९ मे ला चित्रपटाचा मुहुर्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2016 16:47 IST2016-05-04T11:16:06+5:302016-05-04T16:47:57+5:30
पोश्टरगर्ल या सिनेमातून एक भावनिक विषय प्रेक्षकांपर्यंत समर्पकपणे पोहचविणारा महाराष्ट्राचा लाडका अभिनेता हेमंत ढोमे ...

हेमंत होतोय दिग्दर्शक... ९ मे ला चित्रपटाचा मुहुर्त
दिग्दर्शनात पदार्पण का करावेसे वाटतेय असे विचारल्यावर हेमंत सांगतोय, मी लेखक आहे. अन याआधी मी बºयाच चित्रपटांसाठी लेखन केलेय. जेव्हा एखादा लेखक ती कथा लिहीत असतो तेव्ही त्याला त्या कथेला पडद्यावर योग्य न्याय देणे सोपे जाते. कारण त्याला तो सिनेमा डोळ््यासमोर दिसत असतो. असेच माझ्या बाबतीत झाले आहे मला माझी ही स्टोरी व्हीज्युअलाईज होतीये. अन म्हणुनच मी आता दिग्दर्शनात येतोय. जितेंद्र जोशी अन अनिकेत विश्वासराव यांच्या भुमिका यामध्ये असणार आहेत. चित्रपटाचे संगीत अमितराज यांचे असुन गाणी क्षितीज पटवर्धन यांनी लिहीली आहेत. ९ मे ला या चित्रपटाचा मुहुर्त होणार असुन लवकरच टिझर येईल.