नव्या नवलाईने हेमांगी कवीने नवीन घरात केला गृहप्रवेश, पाहा त्याचीच एक झलक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2020 02:27 PM2020-11-24T14:27:12+5:302020-11-24T14:33:45+5:30

 'म्हाडा' मध्ये सलग 8 वर्ष प्रयत्न केल्यावर  2016 मध्ये हेमांगीला  घराची लॉटरी लागली आणि बोरीवलीत तिला स्वतःचे घर मिळाले.

Hemangi Kavi Shares Inside Pictures Of Her new Home | नव्या नवलाईने हेमांगी कवीने नवीन घरात केला गृहप्रवेश, पाहा त्याचीच एक झलक

नव्या नवलाईने हेमांगी कवीने नवीन घरात केला गृहप्रवेश, पाहा त्याचीच एक झलक

googlenewsNext

मुंबईत स्वतःचे हक्काचे घर असावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते.  हे स्वप्नपूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण झटत असतो.प्रत्येकाच्या स्वप्नातील घराच्या कल्पना या वेगवेगळ्या असतात. त्या दृष्टीने आपल्या स्वप्नातलं घर घडवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती मेहनत करत असतो.याला कलाकार मंडळीही अपवाद नसतात.विशेष म्हणजे आजपर्यंत अनेकदा बॉलिवूड कलाकार असो किंवा मराठी कलाकर यांच्या आलिशान घराचे बाहेरील आणि आतील फोटो अनेकदा समोर आली आहेत.

मुंबईत आपले हक्काचे घर असावे असे  स्वप्न मराठी अभिनेत्री हेमांगी कवीनेही पाहिले होते.अखेर म्हाडामुळे तिचे हे स्वप्न पूर्ण झाले.  'म्हाडा' मध्ये सलग 8 वर्ष प्रयत्न केल्यावर  2016 मध्ये हेमांगीला  घराची लॉटरी लागली आणि बोरीवलीत तिला स्वतःचे घर मिळाले. इतके वर्ष हेमांगी भाडेतत्त्वावर कधी दादर तर कधी दहिसर मध्ये राहिली. अखेर मोठ्या मेहनतीने आज तिने मुंबईत स्वतःचे घर खरेदी केले आहे.  

 

आमच्या हक्काच्या घरात 'गृहप्रवेश' केल्याचे सांगत तिने पोस्टच्या माध्ममातून आपला आनंद चाहत्यांसह शेअर केला आहे. हेमांगीने तिच्या नवीन घराचे काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोजमध्ये ती घरात निवांत क्षण घालवताना पाहायला मिळत आहे. खास पद्धतीने हेमांगीने आपले घर सजवले आहे.सिनेसृष्टीत मोठ्या मेहनतीने हेमांगीने आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे.


कलाकारांचे पैसे थकवणाऱ्यांवर भडकली हेमांगी कवी म्हणाली.....


हेमांगी आपल्या रोखठोक बिनधास्त अंदाजामुळेही चर्चेत असते. सोशल मीडियावर सक्रिय असून आपले चाहत्यांच्या संपर्कात असते. मध्यंतरी हेमांगीने केलेल्या एका पोस्टनेही चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने म्हटले होते की, आधीच 100 दिवस काम नाही त्याचे पैसे नाही आणि आता काम सुरू होऊन त्यात ही 100 दिवसांची भर! 365 पैकी 200 दिवस पैसे अकाऊंटला जमा होणार नाहीत...कर्ज घेतलेल्या बँकेत कसं पाऊल ठेवावं कळत नाहीये! इन्शरन्स पॉलिसेचे हप्ते कसे भरायचे? घरात दोघे ही याच क्षेत्रात काम करत असतील त्यांचं काय? उरलेल्या 165 दिवसांमध्ये या पैशांसाठी सतत फोन करायचा, मेसेज करायचे... आज ...उद्या... या आठवड्यात करत करत अजून किती दिवस जाणार माहीत नाही! कलाकार आणि टेक्निकल टीमकडून पूर्ण सपोर्टची अपेक्षा !

Web Title: Hemangi Kavi Shares Inside Pictures Of Her new Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.