किंग खानच्या हस्ते ह्रदयांतर चित्रपटाचा मुहूर्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2016 11:42 IST2016-12-11T11:39:14+5:302016-12-11T11:42:40+5:30

सध्या मराठी चित्रपटांचा मुहूर्त बॉलिवुडच्या तगडया कलाकारांच्या हस्ते करण्याची क्रेझ निर्माण झालेली दिसत आहे. कारण नुकताच कोरिओग्राफर गणेश आचार्य ...

The heart of King Khan at the heart of the film | किंग खानच्या हस्ते ह्रदयांतर चित्रपटाचा मुहूर्त

किंग खानच्या हस्ते ह्रदयांतर चित्रपटाचा मुहूर्त

्या मराठी चित्रपटांचा मुहूर्त बॉलिवुडच्या तगडया कलाकारांच्या हस्ते करण्याची क्रेझ निर्माण झालेली दिसत आहे. कारण नुकताच कोरिओग्राफर गणेश आचार्य हेदेखील मराठी चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनात पदापर्ण करत आहेत. त्यांच्या चित्रपटाचे नाव स्वामी तिन्ही जगाचा: भिकारी असे आहे. या चित्रपटाचा नुकताच मुहूर्त बिग बी अमिताभ बच्चन यांच्या हस्ते करण्यात आला. आता या चित्रपटाच्या पाठोपाठ आणखी एका मराठी चित्रपटाचा मुहूर्त बॉलिवुडचा किंग खान शाहरूख खान याच्या हस्ते करण्यात आला आहे. ह्रदयांतर असे या चित्रपटाचे नाव आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शन गेली अनेक वर्षे फॅशन जगतात आपले नाव कोरणारा मराठमोळा फॅशन डिझायनर विक्रम फडणीस हे करत आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून ते पहिल्यांदाच दिग्दर्शनात पदापर्ण करत आहे. ह्रदयांतर या चित्रपटाच्या मुहूतार्साठी शाहरुख खानसह प्रताप सरनाईक,अब्बास-मुस्तान, अर्जुन कपूर, सोनाली खरे, मुक्ता बर्वे असे अनेक कलाकार उपस्थित होते. विक्रम हृदयांतरच्या निमित्ताने निमार्ता आणि दिग्दर्शक अशा दोन भूमिकांमधून समोर येणार आहे. कान्हा या मराठी चित्रपटाद्वारे चित्रपट निर्मितीचा श्रीगणेशा करणाºया यंग बेरी एंटरटेन्मेंटने हृदयांतर या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. एका दाम्पत्याच्या वैवाहिक आयुष्यात उठलेली वादळे आणि त्यांनी केलेला सामना याभोवती या चित्रपटाचे कथानक गुंफण्यात आले आहे. तसेच सुबोध  भावे आणि मुक्ता बर्वे अशी हटके जोडीदेखील प्रेक्षकांना या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. 


 

Web Title: The heart of King Khan at the heart of the film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.