​ हर्षवर्धन खेळणार प्रेमाची टी-२०

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2016 13:43 IST2016-12-12T13:43:12+5:302016-12-12T13:43:12+5:30

मराठमोळा हिरो हर्षवर्धन राणे बॉलिवूडमध्ये एकाच चित्रपटातून चांगलाच गाजला आहे. समन तेरी कसम या हर्षवर्धनच्या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांनी पसंती ...

Harshavardhana will play Prem T20 | ​ हर्षवर्धन खेळणार प्रेमाची टी-२०

​ हर्षवर्धन खेळणार प्रेमाची टी-२०

ाठमोळा हिरो हर्षवर्धन राणे बॉलिवूडमध्ये एकाच चित्रपटातून चांगलाच गाजला आहे. समन तेरी कसम या हर्षवर्धनच्या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांनी पसंती दिली आणि हा मराठमोळा मुलगा रातोरात स्टार झाला. हर्षवर्धन आता मराठी चित्रपटसृष्टीत आगमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. लवकरच त्याचा इश्क पे्रम लव हा चित्रपट येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पवन शिंदे यांनी केले आहे.  चित्रपटाच्या नावावरुनच या सिनेमात  आपल्याला रोमँटिक प्रेमकहाणी पाहायला मिळणार हे नक्की. एवढेच नाही तर या चित्रपटात हर्षवर्धन एका मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. हर्षवर्धनच्या मराठी चित्रपटातील आगमनासाठी त्याचे चाहते नक्कीच उत्सुक आहेत. या चित्रपटामध्ये हर्षवर्धन सोबतच आपल्याला अभिनेता वैभव तत्ववादी, रितू वर्मा, किशोर कदम , उषा नाडकर्णी ,अरुण कदम हे कलाकार पहायला मिळणार आहेत. या चित्रपटाच्या टॅगलाईनमध्येच प्रेमाची टी-२० असे लिहिले आहे. त्यामुळे नक्कीच यामध्ये काहीतरी धमाल प्रेमकहाणी आपल्याला दिसणार आहे. अहो एवढेच नाही तर चित्रपटाच्या नावा सोबतच एक लेबल जोडलेले आहे. या लेबलवर लिहिलय की, हे प्रेम जमलं तर चांगल नाहीतर ओएलएक्सपे बेच डाल. आता यावरुन आपल्याला अंदाज येऊ शकतो कि प्रेमावर या चित्रपटामध्ये किती परखडपणे भाष्य करण्यात आले आहे. नक्कीच या चित्रपटात प्रेमाचा त्रिकोण आहे की प्रेमभंग झालेल्या तरुणाची कहाणी हे तर आपल्याला लवकरच समजेल. परंतू यामध्ये खरतर वैभवच प्रेम जमतय की हर्षवर्धनचं हे पाहण्यासाठी आपल्याला थोडी वाट बघावी लागणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होऊ शकतो असे बोलले जातेय. नुकताच या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. यामध्ये तरी सध्या फक्त वैभव तत्ववादीच दिसतोय. त्यामुळे हर्षवर्धनच्या चाहत्यांना त्याची या चित्रपटातील झलक पाहण्यासाठी अजून थोडे थांबावे लागणार आहे. 

Web Title: Harshavardhana will play Prem T20

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.