विदेशातही गाजतोय शुभम मोरे आणि विनायक पोतदार यांचा हाफ तिकीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 11:25 IST2017-10-06T05:55:12+5:302017-10-06T11:25:12+5:30

लहान मुलांचे भावविश्व मोठ्या कॅनव्हासवर मांडत दिग्दर्शक समित कक्कड यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘हाफ तिकिट’ या मराठी चित्रपटाने विदेशातही मराठीचा ...

Half tickets for Gajotoy Shubham More and Vinayak Potdar also abroad | विदेशातही गाजतोय शुभम मोरे आणि विनायक पोतदार यांचा हाफ तिकीट

विदेशातही गाजतोय शुभम मोरे आणि विनायक पोतदार यांचा हाफ तिकीट

ान मुलांचे भावविश्व मोठ्या कॅनव्हासवर मांडत दिग्दर्शक समित कक्कड यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘हाफ तिकिट’ या मराठी चित्रपटाने विदेशातही मराठीचा झेंडा फडकवला आहे. भारतीय प्रेक्षकांच्या मनावर आपला ठसा उमटवणारा ‘हाफ तिकिट’ हा चित्रपट कॅरॉसेल इंटरनॅशनल ड्यू फिल्म डे रिमोस्की या चित्रपट महोत्सवातही कौतुकास पात्र ठरला आहे. भारतामध्ये जुलै २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हाफ तिकिट’ने प्रदर्शनानंतर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलेच; त्यासोबत बऱ्याच चित्रपट महोत्सवांमध्येही आपला ठसा उमटवला आहे. आज विदेशातही या चित्रपटाचा डंका वाजतोय. 
कॅनडामध्ये नुकत्याच पार पडलेल्या ३५व्या कॅरॉसेल इंटरनॅशनल ड्यू फिल्म डे रिमोस्कीमध्ये ‘हाफ तिकिट’ ने प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. हा चित्रपट महोत्सव लहान मुलांसाठी आयोजित करण्यात येतो. रिमोस्कीच्या अनेक शाळांमध्ये ‘हाफ तिकिट’ चित्रपट दाखवण्यात आला असून यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना दिग्दर्शक समित कक्कड यांनी उत्तरे दिली. या महोत्सवानंतर टोराण्टो आंतरराष्ट्रीय बालचित्रपट महोत्सवासाठी ‘हाफ तिकिट’ जाणार आहे.
या चित्रपटात समित कक्कड यांनी मुंबईतील झोपडपट्टीत राहणाऱ्या दोन लहान मुलांची मांडलेली गोष्ट लहानग्या प्रेक्षकांसोबतच मोठ्यांनाही भावली. या शोला समित कक्कडही उपस्थित होते. त्यांनी प्रेक्षक तसेच तिथल्या चित्रपट जाणकारांशी संवाद साधत या चित्रपटामागील भूमिका स्पष्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या शुभम मोरे आणि विनायक पोतदार या बालकलाकारांच्या अभिनयाचे सर्वांनीच भरभरून कौतुक केले. याशिवाय ‘हाफ तिकिट’च्या यशस्वी दिग्दर्शनाबद्दल समित कक्कड यांचेही अभिनंदनही केलं.
व्हिडिओ पॅलेसची निर्मिती असलेल्या या चित्रपटात समित कक्कड यांनी जगण्याचा संघर्ष आणि स्वप्नांचा पाठलाग करण्याचा ध्यास याचा अचूक मेळ साधत दोन लहानग्यांची धडपड सादर केली आहे. या चित्रपटात भाऊ कदम, प्रियांका बोस, उषा नाईक, शशांक शेंडे, जयवंत वाडकर, कैलाश वाघमारे आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत. ‘काक मुत्ताई’ या दाक्षिणात्य चित्रपटाचे अधिकृत रूपांतरण असलेल्या ‘हाफ तिकीट’ या सिनेमाने आजवर बऱ्याच इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल्समध्ये बाजी मारली आहे.

Also Read : हाफ तिकीट चित्रपटाचा हटके प्रमोशन फंडा

Web Title: Half tickets for Gajotoy Shubham More and Vinayak Potdar also abroad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.