हाफ तिकीट चित्रपटाचा हटके प्रमोशन फंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2016 14:18 IST2016-07-12T08:45:11+5:302016-07-12T14:18:28+5:30

चित्रपट आणि त्यांचं प्रमोशन हा सध्या खूप चचेर्चा विषय ठरतो आहे. बॉलिवूडमध्ये तर चित्रपटाच्या मार्केटिंग आणि प्रमोशनसाठी नानाप्रकार केले ...

Half-ticket film promotion promotion fund | हाफ तिकीट चित्रपटाचा हटके प्रमोशन फंडा

हाफ तिकीट चित्रपटाचा हटके प्रमोशन फंडा

त्रपट आणि त्यांचं प्रमोशन हा सध्या खूप चचेर्चा विषय ठरतो आहे. बॉलिवूडमध्ये तर चित्रपटाच्या मार्केटिंग आणि प्रमोशनसाठी नानाप्रकार केले जातात. साऊथ इंडस्ट्रीमध्ये नुकतंच सुपरस्टार रजनीकांत याच्या आगामी कबाली या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्यांनी केलेलं एयर लाईनसोबतच प्रमोशन सध्या खूपच गाजतंय. असाच एक प्रमोशन फंडा हाफ तिकीट या चित्रपटाने केला आहे. 22 जुलैला प्रदर्शित होणाºया व्हिडीओ पॅलेस निर्मित हाफ तिकीट या चित्रपटाने प्रमोशनसाठी साया फुड्स या कंपनीचे हाफ तिकीट या नावाने तब्बल 10,00,000 वेफर्सच्या पाकिटांचं उत्पादन केलं आहे. हे वेफर्स संपूर्ण महाराष्ट्रात आज पासून मार्केट मध्ये उपलब्ध झाले आहेत. हाफ तिकीट या चित्रपटातील दोन लहान निरागस मुलं आणि या चित्रपटाचे  पोस्टर या पॅकवर आहे.  निमार्ता नानूभाई जयसिंघानी आणि दिग्दर्शक समिती कक्कड यांचा हाफ तिकीट या वेफर्सच्या माध्यमातून नक्कीच घराघरांत पोहचेल.

Web Title: Half-ticket film promotion promotion fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.