लग्नाला एक महिना पूर्ण झाल्यानंतर मानसी नाईकने चाहत्यांना दिली ही गुड न्यूज, शेअर केला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 09:03 PM2021-02-19T21:03:47+5:302021-02-19T21:04:11+5:30

मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा यांच्या लग्नाला नुकताच एक महिना पूर्ण झाला आहे.

This is the good news that Mansi Naik gave to the fans after one month of marriage, shared the video | लग्नाला एक महिना पूर्ण झाल्यानंतर मानसी नाईकने चाहत्यांना दिली ही गुड न्यूज, शेअर केला व्हिडीओ

लग्नाला एक महिना पूर्ण झाल्यानंतर मानसी नाईकने चाहत्यांना दिली ही गुड न्यूज, शेअर केला व्हिडीओ

googlenewsNext

मानसी नाईक नुकतीच बॉयफ्रेंड प्रदीप खरेरासोबत लग्नबेडीत अडकली आहे. लग्नानंतर ती प्रदीप खरेराच्या गावी फरीदाबादला गेली होती. ते दोघे मुंबईत परतले आहेत. दरम्यान मानसी आणि प्रदीप एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. नुकताच मानसीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओतून तिने त्या दोघांचा म्युझिक अल्बम भेटीला येत असल्याचे सांगितले आहे.

मानसी नाईक हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर टीझर शेअर करत तिचा आणि प्रदीपचा नवीन म्युझिक अल्बम येत असल्याचे चाहत्यांना सांगितले आहे. तिने व्हिडीओ शेअर करत लिहिले की, लग्न होऊनी महिना झाला ऋतू बहरला, वाटेवर मोगरा उमलला अन दरवळला, मनी मानसी डोळ्यांमध्ये भाव उतरले, प्रदीप झाले अवघे जगणे आणि उजळले.


मानसी नाईकच्या या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. 


मानसीचा नवरा प्रदीप खरेरा हा इंटरनॅशनल बॉक्सर आहे. त्यासोबतच तो अभिनेता आणि मॉडेल आहे. प्रदीप त्याच्या सोशल मीडियावर नेहमीच त्याचे फोटो पोस्ट करत असतो. तो इन्स्टाग्रामवर नेहमीच सक्रिय असतो. त्याला इन्स्टाग्रामवर पाच लाखांहून अधिक जण फॉलो करतात. प्रदीपच्या लूक्सवर त्याचे चाहते चांगलेच फिदा आहेत.

मानसी ही उत्तम डान्सर असून ढोलकीच्या तालावर, हॅलो बोल, मराठी तारका यांसारख्या अनेक मराठी रिअ‍ॅलिटी डान्सिंग शोच्या माध्यमातून तिने आपल्या डान्सचे जलवे दाखवले आहेत. याशिवाय रुपेरी पडद्यावरही मानसीने आपल्या अभिनयाद्वारे रसिकांची मनं जिंकली आहेत.


एकता - एक पॉवर, कुटुंब, तीन बायका फजिती ऐका, जबरदस्त, मर्डर मेस्त्री, ढोलकी, हू तू तू, कोकणस्थ यांसारख्या चित्रपटांमध्ये मानसीने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.

Web Title: This is the good news that Mansi Naik gave to the fans after one month of marriage, shared the video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.