दंगलमध्ये दिसणार गिरीष कुलकर्णी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2016 14:42 IST2016-12-09T12:20:31+5:302016-12-09T14:42:27+5:30
आमीर खानच्या दंगल या चित्रपटाची सध्या सगळीकडेच जोरदार चर्चा आपल्याला पाहायला मिळत आहे. दंगल या चित्रपटातील आमीरचा लुक ते ...

दंगलमध्ये दिसणार गिरीष कुलकर्णी
आ ीर खानच्या दंगल या चित्रपटाची सध्या सगळीकडेच जोरदार चर्चा आपल्याला पाहायला मिळत आहे. दंगल या चित्रपटातील आमीरचा लुक ते त्याच्या मुलींच्या भूमिका केलेल्या अभिनेत्री तसेच या चित्रपटाची कथा या सर्वांविषयी सध्या भरभरुन बोलले जात आहे. दंगलच्या ट्रेलर मधूनच अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर नक्कीच यशस्वी ठरणार असेही सध्या बोलले जात आहे. पण आता मराठमोळ््या प्रेक्षकांसाठी एक खुष खबर आहे. आमीरच्या दंगलमध्ये आपल्याला मराठी मातीतील एक रांगडा अभिनेता म्हणजेच गिरीष कुलकर्णी दिसणार आहे. या चित्रपटामध्ये गिरीषची महत्वपूर्ण भूमिका असल्याचे कळतेय. आमीर खानच्या मुलींचा तो कुस्ती प्रशिक्षक असल्याचे यामध्ये दाखविण्यात आले आहे. हा चित्रपट आमीर त्याच्या मुली आणि कुस्ती या तीन गोष्टींभोवतीच फिरत असल्याचे ट्रेलरमधुन तरी दिसत आहे. त्यामुळे यातील गिरीषची भूमिका किती महत्वपूर्ण आहे याचा आपल्याला नक्कीच अंदाज येऊ शकतो. एका गाण्यामध्ये तो आपल्याला आमीरच्या मुलींचा कोच असल्याचे दिसते. आता त्याची भूमिका ही किती लांबीची आहे हे तर आपल्याला चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच समजेल. परंतू गिरीषला आमीर सोबत मोठ्या पडदयावर काम करण्याची संधी मिळाल्याने तो नक्कीच आनंदी असणार यात काही शंका नाही. आजपर्यंत गिरीषने मराठीमध्ये अनेक दर्जेदार चित्रपटांमध्ये स्वत:च्या अभिनयाची माहोर उमटविलीच आहे. राष्ट्रीय पातळीपर्यंत गिरीषने मजल मारीत नॅशनल अॅवॉर्ड सुद्धा त्याने मिळवला आहे. गिरीषने त्याच्या अनेक उल्लेखनीय भूमिकांसाठी बरेच पुरस्कार देखील पटकाविले आहेत. आता दंगलमध्ये तो काय नवीन करणार हे तर लवकरच सगळ््यांच्या समोर येणार आहे.