शेतकऱ्यांचा प्रश्नांवर काय बोलणार घनश्याम ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2016 16:08 IST2016-10-29T15:38:41+5:302016-10-29T16:08:06+5:30

 Exclusive : Priyanka londhe            घनश्याम दरोडे या १४ वर्षाच्या मुलाने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर ...

Ghanshyam will talk on farmers' issues? | शेतकऱ्यांचा प्रश्नांवर काय बोलणार घनश्याम ?

शेतकऱ्यांचा प्रश्नांवर काय बोलणार घनश्याम ?

 Exclusive : Priyanka londhe

 
         घनश्याम दरोडे या १४ वर्षाच्या मुलाने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर त्याच्या राजकीय मुद्यांवरील भाषणाने धुमाकुळ घातला होता. एवढ्या कमी वयात राजकीय नेत्यासारखा बोलणारा हा मुलगा 'मी योतोय' या मराठी चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गावातील प्रश्नांवर अगदी धडाडीने बोलणारा घनश्याम छोटा पुढारी या नावाने प्रसिद्ध झाला होता. परखडपणे आणि कोणालाही न घाबरता आपल्या गावकऱ्यांसाठी त्यांच्या हक्कासाठी घनश्यामने आवाज उठवला होता. 'मी येतोय' या चित्रपटातूनही तो गावातील समस्या दाखविण्याचा प्रयत्न करणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या अहमदनगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणार या घनश्यामच्या गावी सुरू आहे. सत्य परिस्थितीवर आधारीत हा चित्रपट असल्याचे समजतेय. गावातील शेतकऱ्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो. गावातील राजकीय परिस्थिती तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न या चित्रपटात दाखवण्यात येणार आहेत. या सिनेमात दोन धमाकेदार गाणी आहेत. बाप्पा मोरया आणि धिंगाणा धिंगाणा ही दोन्ही गाणी आदर्श शिंदे यांनी गायली आहेत. या गाण्यामध्ये आपल्याला पूजा सिंधिया ही नवोदित अभिनेत्री पाहायला मिळणार आहे. तसेच या सिनेमामध्ये सत्य परिस्थिती दाखविण्यात येणार असल्याने गावातील काही गावकऱ्यांच्या भूमिका देखील असणार आहेत. त्यामुळे या चित्रपटाला वास्तवाची जोड मिळणार आहे. हा चित्रपट नवीन वर्षामध्ये प्रदर्शित होणार असल्याचे समजतेय. सध्या घनश्याम नववी इयत्तेत शिक्षण घेतो आहे. आता या सिनेमाध्ये हा छोटा पुढारी काय कमाल करतोय ते आपल्याला काही दिवसातच समजेल. 

                                                            

             

 

Web Title: Ghanshyam will talk on farmers' issues?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.