गायत्री झळकणार हिंदी सिनेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2016 17:09 IST2016-05-21T11:34:51+5:302016-05-21T17:09:40+5:30

           रेती, परतू यासारख्या सिनेमांतून दर्जेदार अभिनय साकारणारी अभिनेत्री गायत्री सोहम आज प्रेक्षकांच्या मनात स्वत:ती ...

Gayatri will be seen in Hindi cinema | गायत्री झळकणार हिंदी सिनेमात

गायत्री झळकणार हिंदी सिनेमात


/>           रेती, परतू यासारख्या सिनेमांतून दर्जेदार अभिनय साकारणारी अभिनेत्री गायत्री सोहम आज प्रेक्षकांच्या मनात स्वत:ती जागा काबीज केली आहे असे म्हणायला खरच काही हरकत नाही. मालिकांमध्ये काम केल्यानंतर गायत्रीने काही चांगले चित्रपट केले अन आता ती पुन्हा टेलिव्हीजनकडे वळली आहे. तिच्या या प्रवासाबद्दल गायत्रीने सीएनक्सला दिलेल्याा मुलाखतीत अनेक पैलु उलगडले. बावरे मन हे या मालिकेतून गायत्री पुन्हा एकदा टि.व्ही करतेय. याबद्दल तिला विचारले असता ती म्हणाली, मला नशीबाने अनेक चांगले चित्रपट मिळाले अन माझ्या कामाची प्रशंसा देखील केली गेली. परंतू तुम्हाला सतत लाईम लाईटमध्ये राहण्यासाठी कामाचे स्वरुप बदलावे लागते. आणि म्हणुनच ती सध्या एक मालिका करीत आहे. या मालिकेत तिचा एकदम टिपिकल रोल नाही तर ती  आजच्या काळातील कॉर्पोरेट वुमनचा रोल प्ले करीत आहे. यामध्ये तिचा लुक देखील तुम्हाला बदललेला दिसेल. तीने या रोलसाठी एकदमच शॉर्ट हेअर करुन घेतले आहेत. एका मालिकेत काम केले तर तुम्ही दररोज प्रेक्षकांच्या समोर येता असे गायत्रीने सांगितले. एवढेच नाही तर तिने सिनेमासाठी देखील स्वत:चा वेळ राखुन ठेवला आहे. ती सांगतीये, मी मालिका जरी करत असले तरी माझे महिन्यातले फक्त २० दिवस मी मालिकेचे शुटिंग करते तर १० दिवस सिनेमासाठी ठेवलेले आहेत . सध्या गायत्रीकडे दोन मराठी सिनेमे आहेत तर पंकज पराशर यांच्या आगामी हिंदी चित्रपटातू ती बॉलीवुडमध्ये झळकणार आहे. त्यामुळे गायत्रीचे चाहत्यांसाठी डबल ट्रीट असणार आहे. आपल्याला ती एकाच वेळी मालिका, चित्रपट अन बॉलीवुडमध्ये देखील दिसणार आहे. यालाच म्हणतात लॉटरी लग गयी.

                                 

Web Title: Gayatri will be seen in Hindi cinema

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.