'दिसला गं बाई दिसला' गाण्याच्या रिमेकवर थिरकली गौतमी पाटील, ग्लॅमरस अदांवर नेटकरी झाले फिदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 16:31 IST2025-10-14T16:30:18+5:302025-10-14T16:31:02+5:30
Gautami Patil : आता पुन्हा एकदा गौतमी एका गाण्यामुळे चर्चेत आली आहे आणि ते गाणं म्हणजे सदाबहार लावणी गीत 'दिसला गं बाई दिसला'. हे गाणं नव्या रुपात पाहायला मिळणार आहे.

'दिसला गं बाई दिसला' गाण्याच्या रिमेकवर थिरकली गौतमी पाटील, ग्लॅमरस अदांवर नेटकरी झाले फिदा
आपल्या डान्स स्टाईलने अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणारी आणि तरुणाईची लाडकी असलेली नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या चर्चा नेहमीच होत असतात. गौतमीचा नवा व्हिडीओ किंवा कार्यक्रम म्हटलं की चाहते उत्सुक असतातच. आता पुन्हा एकदा गौतमी एका गाण्यामुळे चर्चेत आली आहे आणि ते गाणं म्हणजे सदाबहार लावणी गीत 'दिसला गं बाई दिसला'. हे गाणं नव्या रुपात पाहायला मिळणार आहे. या गाण्याचा रिमेक प्रेमाची गोष्ट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. नुकतंच हे गाणं भेटीला आलं आहे आणि यातील गौतमीच्या अदांवर चाहते फिदा झाले आहेत.
१९७२ मध्ये रिलीज झालेल्या 'पिंजरा' चित्रपटातील हे गाणं आजही लोक गुणगुणताना दिसतात. याच गाण्याचा रिमेक नुकताच प्रदर्शित झाला असून, या रिमेकवर गौतमी पाटीलने धमाकेदार डान्स केला आहे. नेहमीप्रमाणेच गौतमीची ऊर्जा आणि तिच्या नृत्यातील अदाकारी या गाण्यातही पाहायला मिळाली आहे. या गाण्यातील गौतमीचा लूक खूपच ग्लॅमरस आहे. तिच्या या ग्लॅमरस अदा आणि घायाळ करणाऱ्या हावभावांवर नेटकरी अक्षरशः फिदा झाले आहेत.
एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘प्रेमाची गोष्ट २’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले असून निर्माते संजय छाब्रिया आहेत तर सह निर्माते अमित भानुशाली आहेत. प्रेक्षकांसाठी गाजलेल्या प्रेमकथा घेऊन येणारे सतीश राजवाडे आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आता आणखी एक प्रेमकथा घेऊन येत असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटात भाऊ कदम, स्वप्नील जोशी, ललित प्रभाकर, ऋचा वैद्य आणि रिधिमा पंडित हे कलाकार पाहायला मिळणार आहेत. प्रेम आणि नशीबाचा हा जादुई प्रवास येत्या २२ ऑक्टोबर रोजी अनुभवायला मिळेल.