गणेश-अंबरची सुपरहिट जोडी 'अंड्या चा फंडा'द्वारे पुन्हा एकत्र.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2017 14:26 IST2017-05-04T08:56:52+5:302017-05-04T14:26:52+5:30

मराठी सिनेमातील पठडीबाहेरच्या आणि रिअलिस्टीक विषयांमुळे चर्चेत राहिलेली अंबर हडप-गणेश पंडित ही जोडी पुन्हा एकदा आपल्यासमोर येत आहे. 'बालक ...

Ganesh-Amber's superhit couple will be reunited with 'egg cha fund'. | गणेश-अंबरची सुपरहिट जोडी 'अंड्या चा फंडा'द्वारे पुन्हा एकत्र.

गणेश-अंबरची सुपरहिट जोडी 'अंड्या चा फंडा'द्वारे पुन्हा एकत्र.

ाठी सिनेमातील पठडीबाहेरच्या आणि रिअलिस्टीक विषयांमुळे चर्चेत राहिलेली अंबर हडप-गणेश पंडित ही जोडी पुन्हा एकदा आपल्यासमोर येत आहे. 'बालक पालक' आणि 'यलो' सारख्या दर्जेदार विषयानंतर आता हे दोघे 'अंड्या चा फंडा' या सिनेमाद्वारे एकत्र येत आहेत. आशयपूर्ण कथानकासोबतच रसिकांचे मनोरंजन हा या हिट जोडीचा फॉर्म्युला त्यांच्या या आगामी सिनेमांत देखील वापरला गेला असल्याचे खात्रीलायक सांगता येईल. संतोष शेट्टी दिग्दर्शित आणि लिखित या चित्रपटाचे अंबर-गणेश यांनी पटकथा आणि संवाद लिहिले आहेत.या चित्रपटाविषयी बोलताना,  'आम्ही नेहमीच काही तरी नवीन करण्याच्या प्रयत्नात असतो, सिनेमे मोजके असले तरी चालतील, पण ते नाविन्यपूर्ण असायला हवेत असा आमचा अट्टाहास आहे. हा सिनेमादेखील असाच वेगळ्या धाटणीचा असल्यामुळे आम्हा दोघांना त्याची पटकथा लिहिण्याचा मोह आवरता आला नाही' असे अंबर - गणेश या जोडीने सांगितले. ह्या वेळी ह्या जोडीला एक नवा साथीदार येऊन मिळालाय. त्याच नाव श्रीपाद जोशी.अध्यास क्रिएशन्सचे विजय शेट्टी निर्मित तसेच प्रशांत पुजारी आणि इंदिरा विश्वनाथ शेट्टी ह्यांची सहनिर्मिती असलेल्या या सिनेमाच्या हटके नावामधूनच हा लहान मुलांवर आधारित असल्याचे कळते. दोन जिवलग मित्रांची धम्माल यात पाहायला मिळणार आहे. हि दोघे कशा पद्धतीने एक इच्छा पूर्ण करतात आणि त्या मार्गावर येणारी कोडी कशी उलगडतात? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. हा सिनेमा ३० जून रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. 

Web Title: Ganesh-Amber's superhit couple will be reunited with 'egg cha fund'.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.