गायकवाडांची सूनबाई..! सायली संजीवच्या फोटोशूटवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 19:40 IST2022-04-02T19:40:35+5:302022-04-02T19:40:59+5:30
Sayali Sanjeev: नुकतेच सायली संजीव हिने एक फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये ऑरेंज रंगाच्या साडीमध्ये ती खूपच गोड दिसते आहे.

गायकवाडांची सूनबाई..! सायली संजीवच्या फोटोशूटवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स
मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री सायली संजीव(Sayali Sanjeev)ने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनात घर केले आहे. याशिवाय ती सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. नुकतेच तिने एक फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये ऑरेंज रंगाच्या साडीमध्ये ती खूपच गोड दिसते आहे. तिच्या या फोटोशूटवर चाहत्यांनी सुरेख, सायली तू या साडीमध्ये खूप सुंदर दिसत आहेस, गोड दिसतेय, खूप मनमोहक अशा एकापेक्षा एक कमेंट्स केल्या आहेत. यासोबतच तिच्या सिनेइंडस्ट्रीतील मित्र-मैत्रिणी ऋता दुर्गुळे, तेजस्विनी पंडीत यांनी देखील तिच्या या स्टनिंग लूकची स्तुती केली. पण सायलीच्या या व्हिडीओवर तिच्या काही चाहत्यांनी तिची फिरकीदेखील घेतली आहे.
चाहत्यांनी तिला पुन्हा एकदा क्रिकेटर ऋतुराज गायकवाडवरून चिडवले आहे. गायकवाडांची सूनबाई, ऋतु का राज, सायली गायकवाड असे कमेंट करत चाहत्यांनी सायलीला चिडवले आहे...पण सायलीने अद्यापही यावर कोणतीही कमेंट केलेली नाही. काही महिन्यांपूर्वी क्रिकेटर ऋतुराज गायकवाडने सायलीच्या फोटोवर एक कमेंट केली होती...तेव्हापासून सोशल मीडियावर सायली आणि ऋतुराजमध्ये काहीतरी शिजते आहे, अशा चर्चांना सुरुवात झाली. पण अद्याप या दोघांनीही यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
सायली संजीव काहे दिया परदेस या मालिकेतील गौरी म्हणून घराघरात लोकप्रिय झाली. ती शेवटची शुभमंगल ऑनलाईन या मालिकेत झळकली होती. पण आता सायली लवकरच पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर भेटीला येणार आहे. नुकतीच झिम्मा या चित्रपटात पाहायला मिळाली. या चित्रपटातील तिच्या कामाचे खूप कौतुक झाले.