​फुर्र या चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2017 14:47 IST2017-08-21T05:30:39+5:302017-08-21T14:47:11+5:30

अँफरॉन एंटरटेन्मेन्टचे प्रमुख कुशल आणि अनिरुद्ध सिंग हे 'फुर्र ' या मराठी चित्रपटाची निर्मिती करणार असून या चित्रपटाद्वारे मराठी ...

Furr's filming begins soon | ​फुर्र या चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात

​फुर्र या चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात

फरॉन एंटरटेन्मेन्टचे प्रमुख कुशल आणि अनिरुद्ध सिंग हे 'फुर्र ' या मराठी चित्रपटाची निर्मिती करणार असून या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत .'फुर्र 'या आशयप्रधान चित्रपटाचे दिग्दर्शन समीर आशा पाटील यांचे असून त्यांनी 'चौर्य या पहिल्याच चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीचे लक्ष वेधून घेतले आहे. 
'अँफरॉन एंटरटेनमेंट' ने याआधी अनेक लघुपटांची निर्मिती केली आहे आणि त्या लघुपटांना त्यांच्या आशयप्रधान कथानकामुळे अनेक चित्रपट महोत्सवात मानाचे स्थान देखील मिळाले आहे. एका पंजाबी चित्रपटाची देखील ते निर्मिती करत आहेत. मराठी प्रेक्षक हा कायमच आशयप्रधान कथानकाला प्राधान्य देत असतो हे लक्षात घेऊन आणि आपले विचार चांगल्या कथानकातून आणि आशयातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचावेत या उद्देशाने त्यांनी मराठी चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे.  
फुर्र या चित्रपटाबद्दल बोलताना कुशल सांगतात, "मनोरंजनाचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे फक्त निखळ मनोरंजन आणि दुसरे म्हणजे प्रबोधनात्मक मनोरंजन. दुसऱ्या प्रकारातून प्रेक्षक काहीतरी चांगला विचार करण्यास प्रवृत्त होतो. 
आपल्या पहिल्या चित्रपटाची निर्मिती करताना निर्माते कुशल आणि अनिरुद्ध हे अशा दिग्दर्शकाच्या शोधात होते की, ज्याला चित्रपट माध्यमाची उत्तम जाण असेल, तसेच जो सृजनशील असेल आणि ज्याची चित्रपट दिग्दर्शन करण्याची पद्धत ही सर्वांपेक्षा वेगळी, कथानकाला न्याय देणारी, मनोरंजन करणारी असेल. ते दिग्दर्शकाच्या शोधात असतानाच त्यांची समीरशी भेट झाली. चित्रपटाविषयी चर्चा करताना त्यांच्या हे लक्षात आले की, फुर्र हा नेहमीच्या पठडीतला चित्रपट नाही. प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटना यात संवेदनशील पद्धतीने आणि त्याला विनोदाची झालर चढवून मांडल्या आहेत. सर्व वयोगटातील प्रेक्षकवर्गाला हा चित्रपट नक्की आवडेल आणि प्रत्येकजण आपल्या वैयक्तिक जीवनाशी या चित्रपटाच्या माध्यमातून नाते जोडू शकेल. चित्रपट या माध्यमाची उत्तम समज समीरला आहे आणि त्या माध्यमावरील त्याचे प्रभुत्त्व त्याने अगोदरच सिद्ध केले आहे. म्हणूनच आमच्या निर्मिती संस्थेद्वारे मराठी चित्रपटाची निर्मिती करताना आम्ही समीरची निवड दिग्दर्शक म्हणून केली. समीरने दिग्दर्शित केलेला हा चौथा मराठी चित्रपट असेल असेही चित्रपट निर्मात्यांनी सांगितले. 
फुर्र या चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे .

Web Title: Furr's filming begins soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.