अक्षय टंकसाळेचे फनी फोटोशुट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2017 11:20 IST2017-02-20T05:50:19+5:302017-02-20T11:20:19+5:30

प्रत्येक कलाकारासाठी फोटोशुट करणे हे महत्वाचे असते. कारण फोटोच्या माध्यमातून त्यांना स्वत:चे प्रेझेंटेशन दिग्दर्शकासमोर मांडता येत असतात. अप्रत्यक्षात या ...

Funny photoshoot of tonkasal | अक्षय टंकसाळेचे फनी फोटोशुट

अक्षय टंकसाळेचे फनी फोटोशुट

रत्येक कलाकारासाठी फोटोशुट करणे हे महत्वाचे असते. कारण फोटोच्या माध्यमातून त्यांना स्वत:चे प्रेझेंटेशन दिग्दर्शकासमोर मांडता येत असतात. अप्रत्यक्षात या लूकमध्ये मी फिट बसू शकतो हा हेतू त्यामागे असतो. म्हणूनच कलाकार हे एका ठराविक वेळेनंतर हटक्या लूकमध्ये सातत्याने फोटोशुट करत असल्याचे पाहायला मिळत असतात. आता हेच पाहा ना, प्रेक्षकांचा लाडका अभिनेता अक्षय टंकसाळे यानेदेखील फोटोशुट केले आहे. मात्र त्याने हे फोटोशुट फनी स्टाइलने केले असल्याचे दिसत आहे. 
     
       कारण अक्षयने नुकतेच सोशलमीडियावर त्याच्या फनी फोटोशुटचा व्हिडीओ अपलोड केला आहे. यामध्ये तो अक्षरश: गंमतीशीर पध्दतीने डोक्यावर हॅट घेऊन उडया मारत असताना पाहायला मिळत आहे. त्याचा हा व्हिडीओ पाहून तुम्हालादेखील हसू आवरणार नाही. त्याचबरोबर त्याने या व्हिडीओबरोबरच एक पोस्टदेखील शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून तो सांगतो, बºयाच कालावधीनंतर फोटोशुट करत आहे. फनी स्टाईलने केले आहे. मात्र क्रेझी किया रे.... धूम म्हणत त्याने आपल्या भावना पोस्टमध्ये व्यक्त केल्या आहे. तसेच या फनी स्टाइलने केलेल्या फोटोशुटसाठी त्याने फोटोग्राफर विनायक कुलकर्णी याचे आभारदेखील मानले आहे. 
       
          अक्षयने जाऊ दया ना बाळासाहेब, वायझेड, पोस्टर गर्ल असे अनेक सुपरहीट चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. या चित्रपटांच्या माध्यमातून त्याने आपला चाहतावर्ग निर्माण केला आहे. त्याचबरोबर त्याचा नुकताच हेमंत ढोमे दिग्दर्शित बघतोस काय मुजरा कर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील त्याची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असल्याचे पाहायला मिळाले.