यारी दोस्ती टीमने साजरा केला फ्रेण्डशीप डे
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2016 13:05 IST2016-08-06T07:35:06+5:302016-08-06T13:05:06+5:30
शांतनू अनंत तांबे दिग्दर्शित यारी दोस्ती हा चित्रपट १६ सप्टेबर रोजी प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचे नावच यारी दोस्ती असल्याने ...

यारी दोस्ती टीमने साजरा केला फ्रेण्डशीप डे
ांतनू अनंत तांबे दिग्दर्शित यारी दोस्ती हा चित्रपट १६ सप्टेबर रोजी प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचे नावच यारी दोस्ती असल्याने फ्रे ण्डशीप डे तर साजरा होणारच. यारी दोस्ती या टीमने फ्रेण्डशीप डे चा मुर्हुत साधत महाविदयालयमध्ये जाऊन फ्रेण्डशीप डे मोठया उत्साहात साजरा केला. मैत्री या विषयाला महत्व देणारा हा ट्रेलर प्रत्येकाला शाळेतील आपल्या यारी दोस्तीची आठवण करून देणारा आहे. दोन शाळकरी आणि दोन अशिक्षित,गरीब अशी परिस्थितीच्या विरुद्ध असणोºया चार मित्रांची कथा चित्रपटाच्या ट्रेलरमधून दिसून येते. या चित्रपटात दिग्दर्शक शांतनू अनंत तांबे यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याचे दिग्दर्शन प्रवीण मनोज यांनी केले असून तरुणाईंचा लाडका गायक अवधूत गुप्ते आणि प्रवीण धोने या दोघांनी ते गायले आहे. बिपीन शाह मोशन पिक्चर्स प्रस्तुत आणि पॅशनवल्ड एंटरटेनमेंट्स निर्मित यारी दोस्ती या मिताली मयेकर, श्रेयस राजे, निशा परुळेकर, अशोक पावडे आणि जनार्दन सिंग या कलाकारांचा समावेश आहे.