फ्रँड्री फेम राजेश्वरी खरातने केला जलेबी बेबीवर तुफान डान्स, पाहा हा व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 17:24 IST2021-02-12T17:21:15+5:302021-02-12T17:24:20+5:30

जलेबी बेबी या गाण्यावर राजेश्वरी थिरकताना दिसत आहे. तिचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

Friendly fame Rajeshwari Kharat did a storm dance on Jalebi Baby, watch this video | फ्रँड्री फेम राजेश्वरी खरातने केला जलेबी बेबीवर तुफान डान्स, पाहा हा व्हिडिओ

फ्रँड्री फेम राजेश्वरी खरातने केला जलेबी बेबीवर तुफान डान्स, पाहा हा व्हिडिओ

ठळक मुद्देफँड्री या चित्रपटात राजेश्वरी खरातने शालूची भूमिका साकारली होती. राजेश्वरी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

फँड्री हा सिनेमा म्हणजे नागराज मंजुळे यांची अप्रतिम कलाकृती आहे. समाजाचे वास्तव मांडणाऱ्या या सिनेमाने प्रेक्षक आणि समीक्षक सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते. ग्रामीण भागाची पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटात काम करणारेही अस्सल ग्रामीण बाज असलेले कलाकार होते. सोलापूर जिल्ह्यातील सोमनाथ अवघडे याने चित्रपटात जब्याची भूमिका साकारली होती. त्याची ही भूमिका प्रचंड गाजली होती. तर अभिनेत्री म्हणून नागराज यांनी राजेश्वरी खरात हिची निवड केली होती. तिने साकारलेली शालूची भूमिकाही प्रचंड गाजली होती़. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव, तिचा सहजसुंदर अभिनय चाहत्यांना भावला होता.

फँड्री या चित्रपटात राजेश्वरी खरातने शालूची भूमिका साकारली होती. राजेश्वरी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिने शेअर केलेला एक व्हिडिओ लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. जलेबी बेबी या गाण्यावर राजेश्वरी थिरकताना दिसत आहे. तिचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

नागराज यांनी राजेश्वरीला पहिल्यांदा पुण्यात पाहिले होते. फँड्रीसाठी तिचा एकच चेहरा नागराज यांच्या डोळ्यांपुढे येत होता. पण तिचा शोध लागेना. अनेक प्रयत्नानंतर तिचा शोध लागला. पण पोरीला चित्रपटात काम करू देण्यास तिचे आईवडील तयार होईनात. नागराज यांनी बरीच समजूत काढल्यानंतर राजेश्वरीच्या आईवडिलांनी परवानगी दिली आणि राजेश्वरी कॅमेऱ्यापुढे उभी झाली. फँड्रीनंतर राजेश्वरीचा ‘अ‍ॅटमगिरी’ हा सिनेमा आला होता. राजेश्वरी तिच्या कुटुंबासोबत सध्या पुण्यात राहते. खऱ्या आयुष्यात राजेश्वरी प्रचंड ग्लॅमरस आहे. सोशल मीडियावर ती प्रचंड सक्रिय आहे. अभिनयाचा कुठलाही वारसा नसताना मराठी चित्रपटसृष्टीमध्ये तिने अफलातून यश मिळवले आहे.

Web Title: Friendly fame Rajeshwari Kharat did a storm dance on Jalebi Baby, watch this video