परशाची परदेशवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2016 17:54 IST2016-08-06T12:20:57+5:302016-08-06T17:54:42+5:30

सैराट या चित्रपटानंतर  परशा म्हणजेच आकाश ठोसर याच्या करिअरला चार चॉदच लागले आहे. कारण सैराटच्या प्रसिद्धीनंतर आकाशला लगेच दिग्दर्शक ...

Foreign country | परशाची परदेशवारी

परशाची परदेशवारी

राट या चित्रपटानंतर  परशा म्हणजेच आकाश ठोसर याच्या करिअरला चार चॉदच लागले आहे. कारण सैराटच्या प्रसिद्धीनंतर आकाशला लगेच दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा चित्रपट मिळाला. या चित्रपटाचे नाव एफ यू असे आहे. या चित्रपटात आकाशसोबत संस्कृती बालगुडे, सत्या मांजरेकर, शुभम कॅरोडियन, माधुरी देसाई हे कलाकार झळकणार आहे. या चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी आकाशची परदेशवारी चालू असल्याचे दिसत आहे. नुकतेच काही महिन्यांपूर्वी आकाश मॉरिशसला चित्रिकरण करत असल्याचे काही फोटो सोशलमिडीयावर व्हायरल झाले होते. आता तर थेट आकाश इटलीमध्ये एन्जॉ़य करत असल्याचे काही फोटो सोशलमिडीयावर झळकत आहे. इटली येथील आभिनेत्री संस्कृती बालगुडेसोबतचा एक झक्कास सेल्फी देखील सध्या सोशलमिडीयावर पाहायला मिळत आहे. या किल्कमध्ये आकाशचा लूक देखील लय भारी दिसत आहे. मॉरशिस, इटली असे एकामागोमाग एक आकाशला लॉटरी लागत असल्याने आकाशचे चाहते देखील एकदम खूश झाले असणारे हे नक्की.




 

Web Title: Foreign country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.