"आधी प्रेमात पडावं लागतं!!!", मानसी नाईकची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 06:47 PM2024-01-23T18:47:08+5:302024-01-23T18:47:31+5:30

Manasi Naik : मानसी नाईक हिच्या फोटोंपेक्षा त्यावरील कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

"First you have to fall in love!!!", Mansi Naik's post on social media is in discussion | "आधी प्रेमात पडावं लागतं!!!", मानसी नाईकची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत

"आधी प्रेमात पडावं लागतं!!!", मानसी नाईकची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत

वाट माझी बघतोय रिक्षावाला असं म्हणत सर्वांना थिरकायला लावणारी अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक (Manasi Naik). अभिनेत्री मानसी नाईक मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती सातत्याने वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असते. आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. आता तिची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे. मानसीच्या फोटोंपेक्षा त्यावरील कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मानसी नाईक हिने इंस्टाग्रामवर नुकतेच साडीतील फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती खूपच सुंदर दिसते. तिने हे फोटो शेअर करत लिहिले की, प्रेम म्हणजे काय हे समजण्यासाठी आधी प्रेमात पडावं लागतं!!! या व्हिडीओत तिने काळ्या रंगाची काठपदरी साडी नेसली आहे. मराठमोळा लूक पूर्ण करण्यासाठी कपाळी चंद्रकोर, हातात बांगड्या, गळ्यात चोकर नेकलेस घातला आहे. या गेटअपमध्ये ती खूप सुंदर दिसते आहे.. 

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया...
मानसी नाईकच्या या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे. या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. एका युजरने कमेंट्समध्ये लिहिले की, आयुष्यात असंच हसत खेळत राहावा. दुसऱ्या युजरने म्हटले की, सुंदर. आणखी एका युजरने लिहिले की, खरंच जीवाला घोर लागलाय.

मानसीचे प्रोफेशनलसोबत खासगी आयुष्य चर्चेत
मानसीने प्रदीप खरेराशी १९ जानेवारी २०२१मध्ये लग्नगाठ बांधली होती. त्याआधी ते एकमेकांना डेट करत होते. परंतु, लग्नानंतर त्यांच्यात खटके उडाल्याने घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले.  'गुलाबी नोट', 'बाई वाड्यावर या', 'मस्त चाललंय आमचं' या गाण्यांमुळे मानसीला लोकप्रियता मिळाली. मानसीने अनेक चित्रपटांतही काम केलं आहे. 


 

Web Title: "First you have to fall in love!!!", Mansi Naik's post on social media is in discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.