‘गोवा महोत्सवात’ पहिल्यांदाच दहा चित्रपट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2016 22:00 IST2016-10-26T22:00:41+5:302016-10-26T22:00:41+5:30
यावर्षी गोव्यात आयोजित होणाºया ‘10 व्या एनएफडीसी फिल्म बाजार’साठी दहा मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. ‘सैराट’, ‘नटसम्राट’, ‘दगडी ...

‘गोवा महोत्सवात’ पहिल्यांदाच दहा चित्रपट
फिल्म सिटी व फिल्मबाजार हे संयुक्तपणे दुसºयांना या एनएफडीसी चित्रपट महोत्सवात सहभागी होत आहेत. या महोत्सवात प्रदर्शित होणाºया मराठी चित्रपटात सैराट, नटसम्राट, हाफ टिकीट, डबल सीट, हलाल, कट्यार काळजात घुसली, बर्नी, सहा गन, दगडी चाळ आणि कोटी यांचा समावेश आहे. या सर्व चित्रपटांचे प्रदर्शन ‘इंडस्ट्री स्क्रिनिंग’ व ‘द व्हिविंग रूम’या अंतर्गत करण्यात येणार आहे. या दहा चित्रपटनिर्मात्यांचा समावेश ‘प्रोड्युर्सस लॅब’ मध्ये असणार आहे.
विशेष म्हणजे या चित्रपटांची निवड महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभागाने केली आहे. महोत्सवादरम्यान ‘फिल्म आॅफिस’मधून राज्यातील विविध लोकेशन्सची माहिती देण्यात येणार आहे. प्रोड्युसर्स लॅबमध्ये सहभागी चित्रपट निर्माते नव्या निर्मात्यांना रचनात्मक व आर्थिक या दोन्ही बाबींवर समन्वय साधण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत. ‘इंडस्ट्री स्क्रिनिंग’साठी आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या थेअटर्सची निवड करण्यात आल्याने निर्मात्यांना आपल्या चित्रपटांना डिजिटल प्लेटफार्मवर प्रदर्शित करता येणार आहे.
मागच्या वर्षी ‘एनएफडीसी’ चित्रपट महोत्सवाला मिळालेला प्रतिसाद चांगला होता. दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या वतीने सैराट व नटसम्राट या चित्रपटांचा समावेश करण्यात आल्याने आम्ही आनंदी आहोत असे मत एनएफडीसीच्या प्रवक्त ांनी सांगितले. मराठी चित्रपट अमराठीसुद्धा पाहत आहेत. मराठी चित्रपटांची संख्या वाढत आहे, परंतु, बॉक्स आॅफिसवर मात्र अजुनही हवे तसे यश मिळत नाही. मराठी चित्रपटांचा आधुनिक सुविधा मिळाव्या हा आमचा हेतू आहे. एनएफडीसी चित्रपट महोत्सव हा मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय मंच प्रदान करण्यासाठी योग्य पर्याय आहे. यासाठी दहा मराठी चित्रपटांची निवड आम्ही केली असल्याने चित्रपट निर्माते खूश असल्याचे चित्रनगरीचे संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले.