सई ताम्हणकर पहिल्यांदाच करतेय ही गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 08:30 PM2018-11-24T20:30:00+5:302018-11-24T20:30:00+5:30

आता सई ताम्हणकर आणखीन एक नवीन गोष्ट करताना दिसणार आहे.

This is the first thing that Sai Tamhankar is doing | सई ताम्हणकर पहिल्यांदाच करतेय ही गोष्ट

सई ताम्हणकर पहिल्यांदाच करतेय ही गोष्ट

googlenewsNext
ठळक मुद्देसई करणार स्टॅण्डअप कॉमेडी

सई ताम्हणकर नेहमी नव नवे ट्रेंड्स घेऊन येत असते. बाकी स्टार्स जे करत नाही, ते काहीतरी वेगळे करण्याचा विचार सई करते. मालिका-चित्रपटाच्या क्षेत्रात वावरल्यानंतर सईने एक कुस्ती टिम खरेदी केली आहे. त्यानंतर आता ती लवकरच एका वेबसीरिजमध्येही दिसणार आहे. आता सई आणखीन एक नवीन गोष्ट करणार आहे ती म्हणजे स्टॅंड-अप कॉमेडी. 

सूत्रांच्या माहितीनुसार, स्टँड अप कॉमेडी क्षेत्रात आजपर्यंत कोणी सुपरस्टारने प्रवेश केला नाही. नवे कलाकराचे ह्या क्षेत्राकडे वळतात आणि ह्या क्षेत्रात नाव कमावल्यावर मग ते अभिनय क्षेत्राकडे जातात. पण सईच हेच तर वैशिष्ठ्य आहे. तिला नाविन्याची ओढ आहे. म्हणूनच ती काहीतरी अनोखी गोष्ट करण्याचा विचार करत असते. 
 सई ताम्हणकरने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर नुकताच एक व्हिडिओ अपलोड केला आहे. ज्यात तिने आपल्या नव्या स्टँड अप कॉमेडी प्रयोगाची माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे. 
सई ताम्हणकर याविषयी सांगते की, "मला स्टॅंडअप कॉमेडियन्सबद्दल आणि ह्या क्षेत्राबद्दल खूप आदर आहे. मी माझ्या करीयरमध्ये काही कॉमेडी सिनेमांमध्ये अभिनयही केला आहे. पण स्टॅंड अप कॉमेडी खूप वेगळी असते आणि रंगमंचावर लाइव्ह अभिनय करण्याची नशा काही औरच असते. म्हणून हा नवा अनुभव घेऊन पाहायचा आहे." 


रविवारी संध्याकाळी ठाण्यामध्ये सई ताम्हणकर आपला पहिला स्टॅंडअप कॉमेडी शो करणार आहे. तिच्या या पहिल्यावहिल्या स्टॅंडअप कॉमेडी शोला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहावे लागेल.

Web Title: This is the first thing that Sai Tamhankar is doing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.