फेसबुक मुंबई हेडक्वॉर्टरला भेट देणारे पहिले मराठी कलाकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2016 16:56 IST2016-11-29T16:44:42+5:302016-11-29T16:56:06+5:30
प्रत्येकजण आयुष्यात काहीतरी नवीन शिकण्यास उत्सुक असतो. तसेच तो व्यक्ती काहीतरी नवीन शिकण्यास धडपड करत असतो. अशा परिस्थितीमध्ये एक ...
फेसबुक मुंबई हेडक्वॉर्टरला भेट देणारे पहिले मराठी कलाकार
प रत्येकजण आयुष्यात काहीतरी नवीन शिकण्यास उत्सुक असतो. तसेच तो व्यक्ती काहीतरी नवीन शिकण्यास धडपड करत असतो. अशा परिस्थितीमध्ये एक वर्कशॉप मिळाला तर प्रत्येकाचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्यात जर हा वर्कशॉप फेसबुकचा असेल तर स्वप्नांना चार चाँदच लागले समजा. अशीच एक फेसबुक हेडक्वार्टरला भेटण्याची संधी काही कलाकारांना मिळाली आहे. यामध्ये संजय जाधव, मयुरी वाघ, चिराग पाटील, भूषण पाटील, सायली पंकज आणि उमेश जाधव या कलाकारांचा समावेश आहे. हे कलाकार फेसबुक मुंबई हेडक्वॉर्टरला भेट देणारे पहिले मराठी कलाकार ठरले आहेत. मराठी कलाकार आणि त्यांचे फॅन्स यांना जोडून ठेवणारा सर्वात महत्वाचा दुवा म्हणजे सोशल मीडिया. सोशल मीडियामुळे हे कलाकार आपल्या चाहत्यांपर्यत पोहचू शकतात. तसेच हे माध्यम चाहत्यांपर्यत पोहचण्यासाठी अधिक सोईस्करदेखील आहे. सोशल मीडियावरील कलाकारांचे पोस्ट्स फॅन्सना त्यांच्याबद्दल अपडेट ठेवतात. त्याचप्रमाणे फेसबुक ही सर्वात यूजर फ्रेंडली आणि सर्वांची आवडती सोशल नेटवर्किंग साईट आहे. या सोशल नेटवर्किंग साईटचा अधिक उत्तमरीत्या वापर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे पोहोचू शकतो याबद्दल फेसबुकने मराठी कलाकारांसाठी एक वर्कशॉप आयोजित केले होते. या वर्कशॉपविषयी दिग्दर्शक संजय जाधव सांगतात, फेसबुक आॅफीस हे माझ स्वप्नातील आॅफीस आहे. त्यामुळे या आॅफीसला भेटू देऊन खूपच आनंद झाला आहे. हे पाहिल्यावर माझ ही आॅफीस भविष्यात असच बनविणार हा आत्मविश्वास वाढला आहे. तसेच या वर्कशॉपच्या माध्यमातून प्रोत्साहनदेखील मिळाले. आतापर्यत फेसबुकचा वापर कसा करायचा या बेसिक गोष्टीच माहित होत्या. मात्र या वर्कशॉपमधून फेसबुक प्रत्यक्षात कसे वापरायचे त्याचबरोबर चाहत्यांच्या संख्या कशी वाढवू शकता याची माहिती मिळाली. तर गायिका सायली पंकज सांगते, या वर्कशॉपच्या माध्यमातून मुंबई येथील फेसबुक हेडक्वार्टरला भेट देणारे पहिले कलाकार ठरलो आहोत. या गोष्टीचा खूप आनंद होत आहे. तसेच अभिमानदेखील वाटत आहे. चाहत्यांसोबत कसं अधिक कनेक्ट राहू शकता याचा आत्मविश्वासदेखील वाढला आहे. याचबरोबर या वर्कशॉपचा नक्कीच फायदा होईल असे मला वाटते.