प्रथमेशला बदलायचीय इमेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2016 13:58 IST2016-05-11T08:25:37+5:302016-05-11T13:58:50+5:30

             मला वेड लागले प्रेमाचे असे म्हणणारा दगडु आजही प्रेक्षकांच्या मनात कुठेतरी घर करुन ...

The first image to replace | प्रथमेशला बदलायचीय इमेज

प्रथमेशला बदलायचीय इमेज


/>             मला वेड लागले प्रेमाचे असे म्हणणारा दगडु आजही प्रेक्षकांच्या मनात कुठेतरी घर करुन आहे. प्रथमेश परबने टाईमपासमध्ये साकारलेली दगडुची भुमिका एवढी फेमस झाली की रिअल लाईफ मध्ये देखील प्रथमेशला लोक दगडु म्हणुनच ओळखु लागले. परंतू काहीवेळेस प्रेक्षकांचे हे प्रेम आनंद मिळवून देते तर काही वेळेस या गोष्टींचा त्रास होऊ लागतो. असेच काहीसे झाले आहे प्रथमेश परबच्या बाबतीत. प्रथमेशचा ३५ टक्के काठावर पास हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. या चित्रपटातील प्रथमेशची भुमिका एका कॉलेज गोईंग मुलाची आहे. अन त्याच्या तोंडी देखील दगडु सारखे एकदम हटके डायलॉग्ज आहेत. आता प्रेक्षकांनी प्रथमेशने ३५ टक्के पास या चित्रपटात साकारलेल्या साईराजला डायरेक्ट दगडुशी कम्पेअर केले आहे. याविषयी प्रथमेशले सीएनएक्सने विचारले असता, तो म्हणाला, दगडु आणि साईराज या दोन्ही भुमिका वेगळ््या आहेत. दगडु हा फारच इनोसन्ट होता पण साईराज तसा नाहीये, त्याला सर्व गोष्टी जरा जास्तच समजतात. साईराज आजच्या कॉलेजियन्सला रिप्रेजेन्ट करतो. दगडुच्या भुमिकेने मला खुप प्रेम दिले असले तरी माझा हा रोल दगडुच्या जवळपास जात नाही. या चित्रपटातून मी इमेज बदलण्याचा प्रयत्न केला आहे. साईराजच्या भुमिकेत प्रथमेशने काय वेगळे केले आहे हे पाहण्यासाठी नक्कीच त्याचे चाहते उत्सुक असतील यात मात्र काही शंका नाही.

                                      

Web Title: The first image to replace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.