अखेर हिंदी सैराट विषयी बोललेच नागराज मंजुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2017 17:52 IST2017-01-05T17:31:39+5:302017-01-05T17:52:56+5:30

 हिंदी सैराट दिग्दर्शक करण जोहर करणार असल्याचे बोलले जात होते. करणने मराठमोळ््या सैराट या चित्रपटाचे हक्क नागराज मंजुळेंकडून विकत ...

Finally, Nagraj Manjule spoke about Hindi sarat | अखेर हिंदी सैराट विषयी बोललेच नागराज मंजुळे

अखेर हिंदी सैराट विषयी बोललेच नागराज मंजुळे

 
िंदी सैराट दिग्दर्शक करण जोहर करणार असल्याचे बोलले जात होते. करणने मराठमोळ््या सैराट या चित्रपटाचे हक्क नागराज मंजुळेंकडून विकत घेतल्याच्या बºयाच चर्चा काही दिवसांपासून सुरु होत्या. याविषयी नागराज मंजुळे काही मिडियासमोर बोलले नव्हते. एवढेच काय तर श्रीदेवीची मुलगी जान्हवी यामध्ये आर्चीची भूमिका साकारणार असल्याचे देखील बोलले जात होते. अखेर या सर्व गोष्टींवर नागराज मंजुळेंनी नुकताच खुलासा केला आहे. पत्रकारांनी मंजुळेंना हिंदी सैराटविषयी विचारले असता  या चित्रपटाच्या हिंदी रिमेकबद्दल मात्र नागराज मंजुळे संभ्रमातच दिसले. सैराटच्या हिंदी रिमेकबद्दल मला माहित नाही कि तो होणार आहे की नाही. पता नही अभी तक कुछ, असे नागराज मंजुळे म्हणाल्याचे समजत आहे. 
 नागराज मंजुळे यांनी स्वत:सुद्धा विविध भाषांमध्ये या चित्रपटाच्या रिमेकसाठी उत्सुकता दाखविली आहे. हा चित्रपट विविध भाषांमध्ये आला तर ते मलाही आवडेल, असे नागराज म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून नागराज मंजुळेंच्या दिग्दर्शित या चित्रपटाच्या हिंदी रिमेकसाठी करण जोहर पुढे सरसावल्याची चर्चा होत आहे. सैराटचे दिग्दर्शन करत मराठी चित्रपटांना एक नवी ओळख देणाºया नागराज मंजुळे यांना हिंदी सैराटच्या रिमेकविषयी विचारले असता थेट नकार देत ते म्हणाले की, नाही. सैराट हा विषय माझ्यासाठी आता संपला आहे.अभिनेता आमिर खानच्या सत्यमेव जयते वॉटर कप २०१७ या कार्यक्रमाच्या वेळी नागराज मंजुळे उपस्थित होते. आमिरचा सहभाग असलेल्या या उपक्रमाअंतर्गत नुकतेच लॉन्च करण्यात आलेल्या एका या व्हिडिओचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले आहे. 

Web Title: Finally, Nagraj Manjule spoke about Hindi sarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.